नवी दिल्ली : राष्ट्रीय संघात प्रदीर्घ काळ एकत्र प्रतिनिधित्व करणारे सौरव गांगुली आणि राहुल द्रविड अनुक्रमे बीसीसीआय अध्यक्ष आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमी प्रमुख (एनसीए) म्हणून भारतीय क्रिकेटच्या भविष्यातील कार्यक्रमावर चर्चा करण्यासाठी बुधवारी बेंगळुरूमध्ये एकत्र येतील.
द्रविडने जुलैमध्ये एनसीएचे प्रमुखपद सांभाळले. त्याने या संस्थेसाठी भविष्यातील योजना तयार केलेली आहे. ज्यावेळी या दोन माजी कर्णधारांची भेट होईल त्यावेळी द्रविड आपली योजना शेअर करेल. या बैठकीत बीसीसीआयचे सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी सहभागी होतील. ३० ऑक्टोबला होणाऱ्या बैठकीत एनसीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुफान घोषही सहभागी होतील.
गांगुली आणि द्रविड यापूर्वीही बीसीसीआयच्या तांत्रिक समित्यांचे एकत्र सदस्य राहिलेले आहेत. अशाच एका बैठकीचे अध्यक्षपद गांगुलीने भूषविले होते, तर द्रविड त्यात अंडर-१९ व ‘अ’ संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून सहभागी झाला होता. एनसीए म्हणजे भारतीय क्रिकेटला खेळाडू पुरविणारी संस्था मानली जाते. पण गेल्या काही वर्षांत रिहॅबिलिटेशन क्रेंद ठरले आहे. गांगुली यांनीही अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर तशी कबुली दिली आहे. गांगुली एनसीएच्या नव्या योजनांची माहिती घेतील, अशी आशा आहे.
बीसीसीआयचे एक पदाधिकारी म्हणाले, ‘गांगुली व द्रविड एनसीएच्या भविष्यातील योजना व त्यासंदर्भात येणाºया मुद्यांवर चर्चा करतील.’नवे अध्यक्ष निलंबनातून बाहेर येणारा पृथ्वी शॉसारख्या खेळाडूंच्या रिहॅबिलिटेशन योजनेव्यतिरिक्त जसप्रीत बुमराह व हार्दिक पांड्या यांच्या स्ट्रेंथ व अनुकूलन कार्यक्रमामध्ये किती उत्साह दाखवितात, याबबात उत्सुकता आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण व राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना भारतीय क्रिकेटच्या या दोन दिग्गज खेळाडूंच्या मुलाखतीपासून मोठी आशा आहे.