Join us

इरफान पठाणनला दहशतवादी हाफिज सईद बनायचंय; नेटकऱ्याच्या पोस्टवर भडकला माजी क्रिकेटपटू

इरफान पठाणनं नुकत्याच एका मुलाखतीत ग्रेग चॅपल यांच्याबद्दल मोठं विधान केलं होतं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 16:58 IST

Open in App

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण पुन्हा एकदा नेटिझन्सकडून ट्रोल झाला. आपलं मत स्पष्टपणे मांडणाऱ्या इरफानवर एका नेटकऱ्यानं गंभीर आरोप केले आणि त्याला माजी क्रिकेटपटूनं सडेतोड उत्तर दिलं. इरफानला दुसरा हाफिज सईद बनायचे आहे, असे एका नेटकऱ्यानं ट्विट केलं. त्यावर इरफान चांगलाच खवळला अन् त्यानं त्या नेटकऱ्याच्या ट्विटचा स्क्रिनशॉट शेअर करत नाराजी व्यक्त केली.

इरफान पठाणनं नुकत्याच एका मुलाखतीत ग्रेग चॅपल यांच्याबद्दल मोठं विधान केलं होतं. इरफानची क्रिकेट कारकीर्द  टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक चॅपल यांच्यामुळे संपुष्टात आली, असा अनेकांचा दावा होता. पण, इरफानचं मत काही वेगळेच होते. त्यानं चॅपल यांना दोष देणं चुकीचं असल्याचे म्हटले. इरफानचं हे म्हणणं एका चॅनलनं ट्विटवर पोस्ट केलं आणि त्यावर एका नेटकऱ्यानं कमेंट केली. त्यात तिनं लिहिलं की,''दुसरा हाफिज सईद बनण्याच्या महत्वकांक्षेला इरफान पठाण लपवू शकत नाही.''

या कमेंटवर इरफान पठाण खवळला. त्यानं लिहिलं की,''ही काही लोकांची मानसिकता आहे. आपण कुठे पोहोचलो आहोत? लाजीरवाणी आणि घृणास्पद.''

इरफाननं 29 कसोटी सामन्यांत 1105 धावा करताना 100 विकेट्स घेतल्या. 120 वन डे आणि 24 ट्वेंटी-20 सामन्यांत त्याच्या नावावर अनुक्रमे 1544 व 172 धावा आणि 173 व 28 विकेट्स आहेत.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

मानलं तुम्हाला; रितेश देशमुख आणि जेनेलियाचा अवयवदानाचा संकल्प!

कोरोनामुक्त होताच शाहिद आफ्रिदी काश्मीर मुद्द्यावर बरळला; केलं मोठं विधान

Cricket is Back: जेम्स अँडरसननं घेतली विकेट अन् खेळाडूंचं सोशल डिस्टन्सिंग सेलिब्रेशन

न्यूड फोटो शेअर करणाऱ्या महिला खेळाडूवर कारवाई; म्हणाली, स्वातंत्र्यावर घाला!

Video : ... म्हणून अजिंक्य रहाणेनं मानले सरकारचे आभार, शेतकऱ्यांबद्दल काढले गौरवौद्गार

धक्कादायक: यूनिस खाननं पाकिस्तानच्या फलंदाजी प्रशिक्षकाच्या गळ्यावर धरला होता चाकू  

टॅग्स :इरफान पठाणहाफीज सईदसोशल मीडिया