इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये सध्या व्ह्यूवर्सशीपची चढाओढ पाहायला मिळतेय... चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातल्या काल झालेल्या सामन्यात जिओ सिनेमावर २.२ कोटी लोकांनी मॅच पाहिली. तेच दुसरीकडे थेट प्रक्षेपण करणाऱ्या डिस्ने स्टारलाही रेकॉर्ड ब्रेकिंग व्ह्यूवर्सशीप मिळाली. आयपीएल २०२३च्या सुरुवातीच्या १० सामन्यांसाठी तब्बल ६२३० कोटी मिनिटे पाहण्याचा वेळ नोंदवला आहे आणि ३०.७ कोटी दर्शकांनी थेट प्रक्षेपण पाहिले आहे. मागील आयपीएल आवृत्तीच्या तुलनेत २३% अधिक व्ह्यूवर्सशीप वाढलेले आहे. ही IPL इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च आकडेवारी आहे.
डिस्ने स्टारचे स्पोर्ट्स हेड संजोग गुप्ता म्हणाले, “आम्ही टाटा IPL 2023 च्या डिस्ने स्टारच्या प्रसारणाला मिळालेल्या उदंड प्रतिसादाने आनंदित झालो आहोत. आयपीएलच्या उद्धाटन सामना 5.6 कोटी लोकांनी टीव्हीवर पाहिला आणि ही आयपीएल इतिहासातील आतापर्यंतची सर्वोच्च (कोविड वेळा वगळून) आकडेवारी आहे."