Join us  

"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल

या व्हिडिओमध्ये सईद अन्वरने, महिलांना कमावण्याची संधी दिली जात असल्याने पाकिस्तानात घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे, असे म्हटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 3:30 PM

Open in App

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर सईद अन्वरचा एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. मात्र, या व्हिडिओमध्ये त्याने क्रिकेटसंदर्भात नव्हे, तर महिलांसंदर्भात भाष्य केले आहे. सईदच्या या व्हायरल व्हिडिओवर जोरदार टीका होत आहे. या व्हिडिओमध्ये सईद अन्वरने, महिलांना कमावण्याची संधी दिली जात असल्याने पाकिस्तानातघटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे, असे म्हटले आहे. सईदच्या या वक्तव्यामुळे चाहत्यांनाही धक्का बसला आहे. 

एवढेच नाही, तर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शॉन टेट आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन यांनीही हा बदलता काळ व्यवस्थित करण्यासाठी आपल्यासोबत चर्चा केली असल्याचेही सईद अन्वरने म्हटले आहे. 55 वर्षीय सईद अन्वरने पाकिस्तानसाठी 55 कसोटी आणि 247 एकदिवसीय सामने खेळले आहेत. सईद अन्वरहा त्याच्या काळातील सर्वोत्तम सलामीवीरांमध्ये गणना जातो.

या व्हायरल व्हिडिओमध्ये सईद अन्वर म्हणत आहे, 'मी संपूर्ण जग फिरून आलो आहे. मी नुकताच ऑस्ट्रेलियातून येत आहे. तरुण रडत आहेत, पती-पत्नी घरात भांडत आहेत. परिस्थिती एवढी बिघडली आहे की, त्यांनी मुलींना कामावर जुंपले आहे. मला ऑस्ट्रेलियाचे महापौर म्हणाले, तुमच्याकडे डिप्रेशन आणि ड्रग्स का आहे, आत्महत्या का आहेत? ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर शॉन टॅटने मला बोलावले. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने मला बोलावले की, आमची परिस्थिती सांग कशी ठीक होईल? मला ऑस्ट्रेलियाचे मेयर म्हणाले, आम्ही जेव्हापासून महिलांना कमाईसाठी जुंपले, आमची संस्कृती बर्बाद झाली."

सईद पुढे म्हणाले, "पाकिस्तानात जेव्हापासून महिलांनी कमवायला सुरुवात केली, तीन वर्षांत 30 टक्के तलाक वाढले आहेत. तू निघून जा... मी कमाई करू शकते, घर चालवू शकतो... हा संपूर्ण गेम प्लॅन आहे माझ्या मित्रानो. जोवर तुम्हाला उपदेश मिळत नाही, तोवर तुम्हाला हा गेम प्लॅन समजू शकणार नाही. आपण आंधळे आहात, एका हातात साप अणि दुसऱ्या हातात दोरी आहे. आपण म्हणत आहात, साप कुठे मला तर दोन्ही सारखेच वाटत आहे. जेव्हा डोळे उघडतील तेव्हा समजेल." 

टॅग्स :पाकिस्तानमहिलानोकरीघटस्फोट