ठळक मुद्देभारतीय कर्णधार विराट कोहलीच्या फिटनेसबाबतच्या कडक धोरणामुळे डीएनए चाचणीप्रत्येक खेळाडूच्या अनुवंशिक फिटनेसबाबत माहिती मिळत आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या फिटनेसबाबतच्या कडक धोरणामुळे भारतीय क्रिकेटपटूंना आता डीएनए चाचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूच्या अनुवंशिक फिटनेसबाबत माहिती मिळत आहे.
या चाचणीमुळे खेळाडूंना स्वत:चा वेग वाढविणे, स्थूलता कमी करणे, जोश वाढविणे आणि स्नायू बळकट करण्यासाठी मदत मिळत आहे.
बीसीसीआयने संघाचे ट्रेनर शंकर बासू यांच्या शिफारशीनंतर ही चाचणी सुरू केल्याचे वृत्त आहे. यामुळे राष्ट्रीय संघासाठी व्यापक फिटनेस कार्यक्रम तयार करण्यास मदत होईल.
डीएनए चाचणी किंवा अनुवंशिक फिटनेस चाचणीमुळे ४0 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीचा फिटनेस, तब्येत आणि पोषण तथ्यांबाबत माहिती मिळू शकते. त्यानंतर याचा संपूर्ण अहवाल तयार करण्यासाठी प्रत्येक खेळाडूची डीएनए आकडेवारी, व्यक्तीचे वजन, खाण्याच्या सवयी याची सांगड घालण्यात येईल.
बीसीसीआयच्या एका सिनिअर पदाधिकार्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, ‘आम्ही गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट पटूंची डीएनए चाचणी सुरू केलेली आहे. फिटनेसच्या नव्या निकषानुसार हे करण्यात येत आहे. संघ व्यवस्थापनाने चाचणी घेण्याचे ठरविले आहे. डीएनए चाचणी सर्वप्रथम अमेरिकेमध्ये एनबीए (बास्केटबॉल) आणि एनएफएलमध्ये सुरू झाली होती.’
हे अधिकारी पुढे म्हणाले,‘शंकर बासू यांनी ही संकल्पना मांडली आणि ती उपयुक्तही ठरली. प्रत्येक खेळाडूच्या चाचणीसाठी बीसीसीआयला २५ ते ३0 हजार रुपये खर्च करावे लागत आहे. ही फार मोठी नाही. ’
यापूर्वी भारतीय संघातील खेळाडूंच्या शरीरातील चरबीच्या टक्केवारीची माहिती घेण्यासाठी स्किनफोल्ड चाचणी व त्यानंतर डेक्सा चाचणी होत हो ती.
सध्या सिनिअर राष्ट्रीय संघातील खेळाडूंसाठी शरीरात चरबीची टक्केवारी २३ टक्के आहे. ही टक्केवारी पाकिस्तान व न्यूझीलंडसह अनेक आं तरराष्ट्रीय क्रिकेट संघासाठी निकष आहे. अनेक क्रिकेटपटूंना कडव्या सरावानंतरही शरीरातील चरबी एका निश्चित स्तरापर्यंत कमी का होत नाही, याची माहिती नाही.
अधिकारी पुढे म्हणाले,‘काही खेळाडू लहानपणापासून मोठय़ा प्रमाणात दूध पित होते. कारण दुधामुळे शरीर अधिक बलशाली होते, असा आमसमज आहे. त्यानंतर त्यांना कळते की, कडव्या सरावानंतरही त्यांचे शरीर सध्याच्या खेळासाठी योग्य नाही. चाचणीनंतर काही खेळाडूंना कळले की, त्यांना लॅक्टोज पचविता येत नाही. दूधामध्ये लॅक्टोज असते. काही खेळाडू मटन बिर्यानीचे शौकिन आहेत. विशिष्ट प्रकारचे भोजन केल्यानंतर त्यांच्या शरीराला काय आवश्यक आहे, याची माहिती मिळाली. भुवनेश्वर कुमारच्या शक्ती व फिटनेसमध्ये सुधारणा झाली आहे. तो वन-डे व टी-२0 मध्ये सात त्याने खेळत आहे. चॅम्पियन ट्रॉफी सुरू झाल्यानंतर भुवनेश्वरने १९ वन-डे व ७ टी-२0 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याचा अनुवांशिक चाचणी अहवाल तयार करण्यात आल्यानंतर नव्या फिटनेस कार्यक्रमामुळे हे शक्य झाले आहे. डीएनए चाचणीमुळे शरीराची क्षमता कळते आणि त्या खेळाडूला कशा प्रकारचे भोजन व कशा प्रकारची मेहनत उपयुक्त ठरू शक ते, याची माहिती मिळते.
Web Title: DNA test for the fitness of Indian cricketers
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.