मुंबई : भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री सध्याच्या घडीला संपातलेले पाहायला मिळतात. कारण त्यांनी काही दिवसांपूर्वी एका खेळाडूबाबत वक्तव्य केले होते. पण याच खेळाडूबाबत त्यांनी विरोधी वक्तव्य केले आहे. याबाबत त्यांना विचारले असता, मी संघात काय तबला वाजवायला आहे का, असा संतापजनक प्रश्न शास्त्री यांनी विचारला आहे.
काही दिवसांपूर्वी शास्त्री यांनी पंतला ताकिद दिली होती. शास्त्री म्हणाले होते की, "वेस्ट इंडिजमध्ये पोर्ट ऑफ स्पेन येथील सामन्यात पंत पहिल्याच चेंडूवर आऊट झाला. त्याच्यासमोर कर्णधार विराट कोहली हा खेळपट्टीवर होता आणि भारतीय संघ धावांचा पाठलाग करत होता. त्यावेळी संघाला पंतच्या धावांची गरज होती. पण पंत पहिल्याच चेंडूवर आऊट झाला. त्यामुळे यापुढे जर पंत असाच खेळत राहीला तर त्याला संघात स्थान मिळणार नाही."
पण शास्त्रींना हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये वेगळी भूमिका व्यक्त केली होती. शास्त्री म्हणाले की, " शास्त्री म्हणाले की, जर एखाद्या खेळाडूचे काही चुकत असेल तर त्याबाबत बोलणे हे माझे कर्तव्य आहे. मला संघात तबला वाजवायला ठेवलेले नाही. पंत जेव्हा चुकला तेव्हा त्याच्यावर मी टीका केली होती. पण पंत हा चांगला खेळाडू आहे. तो आक्रमक रुप धारण करू शकतो. जेव्हा पंतला गरज असेल तेव्हा नक्कीच आम्ही त्याला पाठिंबा देऊ."
ट्वेंटी-20 मालिका बरोबरीत सुटल्यानंतर दोन्ही संघांनी आता कसोटी मालिकेकडे मोर्चा वळवला आहे. 2 ऑक्टोबरपासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या मालिकेत सर्वांना उत्सुकता लागली आहे ती रोहित शर्माच्या ओपनिंगची. ट्वेंटी-20 आणि वन डे क्रिकेटमध्ये रोहित हा भारताचा प्रमुख सलामीवीर आहे, परंतु कसोटीत रोहित 5 किंवा 6 व्या क्रमांकावर येतो. मात्र, आता कसोटीतही त्याला ओपनिंगची संधी मिळणार आहे. त्याच्या या संधीबाबत मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी मोठं विधान केलं आहे.
मर्यादित षटकांच्या सामन्यात रोहितची कामगिरी लक्षात घेऊनच 2013मध्ये त्याला ओपनिंग करण्याची संधी देण्यात आली. पण, कसोटीत त्याच्याकडून तशाच कामगिरीच लगेच अपेक्षा केली जाऊ नये. कसोटीत रोहितला ओपनिंगला पाठवण्याबाबत शास्त्री म्हणाले,''मुंबईसाठी सलामीला खेळायला सुरुवात कर असा सल्ला मी रोहितला 2015-16मध्ये दिला होता. त्याच्याकडे तो X फॅक्टर आहे, परंतु 5 व्या किंवा 6व्या क्रमांकावरून थेट सलामीला खेळणं तितकं सोपं नाही. रोहित या नव्या जबाबदारीत यशस्वी होईल आणि त्यासाठी त्याला पुरेसा वेळ देण्याची आमची तयारी आहे''
यावेळी शास्त्रींनी त्यांचा स्वतःचा अनुभवही सांगितला. ''रोहितला 2015 साली सलामीला येण्याचा सल्ला देण्यामागे एक कारण होते. मला आलेल्या अनुभवातून तो सल्ला दिला होता. भारतासाठी सलामी करणारे अनेक खेळाडू आहेत, पण ते फक्त फलंदाज आहेत, परंतु गोलंदाजी करू शकणारे मोजकेच आहेत. मायदेशात खेळताना तुम्हाला काही वेळेस पाच फलंदाजांसहच खेळावे लागते. मला सलामीला खेळण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य,''असे शास्त्रींनी सांगितले.
Web Title: Do I want to play tabla in the team? Ravi Shastri is angry
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.