कोलंबो - हार्दिक पंड्याशी स्वत:ची तुलना करीत मी दडपणात येऊ इच्छित नाही. याऐवजी कामगिरीत सुधारणा करण्यावर माझा भर असेल. पंड्याशी माझी तुलना होऊ नये, असे आवाहन आॅल राऊंडर विजय शंकर याने केले आहे. विजयने काल बांगलादेशविरुद्ध मोक्याच्या क्षणी दोन बळी घेत सामनावीर पुरस्कार जिंकला होता.
अष्टपैलू म्हणून हार्दिकने संघात स्थान निश्चित केले आहे. हे स्थान घेण्यासाठी तू कशा प्रकारचे प्रयत्न करीत आहेस, असा सवाल शंकरला विचारण्यात आला होता.
यावर विजय म्हणाला,‘ मी पंड्याशी तुलना करूइच्छित नाही. प्रत्येक दिवशी चांगली कामगिरी होणे हेच आॅल राऊंडर या नात्याने ध्येय आखले आहे. ’
विजयला काल पहिला आंतरराष्टÑीय बळी मिळविण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागली. विजयच्या चेंडूवर मिड आॅफवर सुरेश रैना याने झेल सोडला. त्याआधी वॉशिंग्टन सुंदरनेदेखील विजयच्या पहिल्याच षटकात झेल घेण्याचा प्रयत्न केला पण तो अपयशी ठरला. विजयवर याचा कोणताही परिणाम झाला नव्हता. त्याने पुढच्याच षटकांत चांगली गोलंदाजी केली.
विजय शंकर याला हार्दिक पंड्याचा बॅकअप म्हणून पाहिले जात आहे. (वृत्तसंस्था)
माझ्यावर त्याचा परिणाम झाला नव्हता. कारण झेल सुटणे हा खेळाचाच एक भाग आहे. त्या वेळी पहिला बळी मिळाला असता तर बरे वाटले असते, असे सांगून विजय पुढे म्हणाला, ‘माझ्या मते पांढºया चेंडूवर विद्युत प्रकाशझोतात क्षेत्ररक्षण करणे सोपे नाही याची मला जाणीव आहे. त्यामुळे झेल सुटला तरी मला वाईट वाटले नाही. मी पुढील चेंडू तितक्याच दमदारपणे टाकण्यावर भर दिला.’ - विजय शंकर
ही शानदार कामगिरी -रोहित
कर्णधार रोहित शर्मा याने विजयानंतर सहका-यांचे कौतुक केले. ही शानदार कामगिरी होती, असे सांगून रोहित पुढे म्हणाला, ‘मला अशाच कामगिरीची अपेक्षा होती. सामन्याच्या अखेरच्या चेंडूपर्यंत सामना चालेल अशी अपेक्षा होती. पण आठ चेंडूआधीच विजय साकार झाला. दुस-या सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षणात झालेल्या चुकांची कबुली देत रोहितने पुढील सामन्यात या चुका टाळाव्या लागतील, असे स्पष्ट केले.
श्रीलंकेविरुद्ध काय चुका केल्या याची जाणीव होताच काल चेंडू हिट करण्यावर भर देण्यात आला. आम्ही मोठी फटकेबाजी मारण्यावर लक्ष केंद्रित केले होते. झेल टिपण्याच्या प्रयत्नात आमूलाग्र सुधारणा करण्यावर भर देणार असल्याचे रोहितचे मत होते.
बांगलादेशचा कर्णधार मोहम्मदुल्लाहने पराभवाचे खापर फलंदाजांवर फोडले. आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. आणखी ३० धावा अधिक काढायला हव्या होत्या. यामुळे निकालात फरक पडला असता, असे त्याचे मत होते.
कालच्या सामन्यात ठरावीक अंतराने गडी बाद झाल्याने बांगलादेशच्या संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. तसेच बांगलादेशची गोलंदाजीदेखील काहीशी स्वैर ठरली.
Web Title: Do not compare to Pandya - Shankar
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.