दुबई :राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद संघांपुढे इंडियन प्रीमियर लीगमध्ये ‘करा अथवा मरा’ अशी स्थिती आहे. गुरुवारी उभय संघादरम्यान लढत होणार असून दोन्ही संघातील अनुभवहिन युवा खेळाडू आपली छाप सोडण्यासाठी प्रयत्नशील असतील.
सनरायजर्स आठ संघाच्या स्पर्धेत गुणतालिकेत तळातून दुसऱ्या स्थानी आहे तर गेल्या लढतीत चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळविणारा राजस्थान रॉयल्स संघ त्याच्यापेक्षा एका स्थानाने पुढे आहे. सनरायजर्स संघाला प्ले-ऑफच्या आशा कायम राखण्यासाठी उर्वरित पाच सामने जिंकावे लागतील तर रॉयल्स संघ विजयी आगेकूच कायम राखण्यास प्रयत्नशील असेल. कर्णधार वॉर्नरला फलंदाज व गोलंदाजांकडून शानदार कामगिरीची आशा असेल. मजबूत बाजू -
राजस्थान - जोफ्रा आर्चरच्या नेतृत्वात रॉयल्सचे गोलंदाजी आक्रमण मजबूत. फिरकीपटू श्रेयस गोपाल व राहुल तेवतिया यांची शानदार कामगिरी. गेल्या लढतीत जोस बटलरची शानदार फलंदाजी.हैदराबाद - अव्वल चार फलंदाजांमध्ये डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेयरस्टॉ, वॉर्नर, मनीष पांडे आणि केन विलियम्सन यांचा समावेश.
कमजोर बाजूराजस्थान - सिनिअर खेळाडू अपयशी ठरत असल्यामुळे कार्तिक त्यागी व रियान पराग यांच्यावर अतिरिक्त दडपण. बेन स्टोक्सही कामगिरी करण्यात अपयशी. हैदराबाद - सुपर ओव्हरमध्ये पराभव पत्करावा लागल्यामुळे मनोधैर्य ढासळले. दुखापतीमुळे भुवनेश्वर कुमार व अष्टपैलू मिशेल मार्श बाहेर झाल्यामुळे संघाचा समतोल ढासळला.
आमने-सामनेसामने - ११विजय - हैदराबाद - ६राजस्थान - ५