भीक मागून जगणाऱ्या तुझ्या देशासाठी काहीतरी कर; सुरेश रैनानं आफ्रिदीला जागा दाखवली

व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या सुरुवातीला आफ्रिदीने कोरोना व्हायरसबाबत बोलत आहे पण त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काश्मीरबाबत बोलत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 12:22 PM2020-05-18T12:22:03+5:302020-05-18T12:22:29+5:30

whatsapp join usJoin us
Do something for your failed nation; Suresh Raina hits back at Shahid Afridi svg | भीक मागून जगणाऱ्या तुझ्या देशासाठी काहीतरी कर; सुरेश रैनानं आफ्रिदीला जागा दाखवली

भीक मागून जगणाऱ्या तुझ्या देशासाठी काहीतरी कर; सुरेश रैनानं आफ्रिदीला जागा दाखवली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणं चांगलंच महागात पडताना दिसत आहे. पाकव्याप्त काश्मीर खोऱ्यात गरजूंना मदत करण्यासाठी आफ्रिदी गेला अन् तेथे भारतीयांबद्दल वादग्रस्त विधान केलं. त्यानंतर आफ्रिदीचा नेटिझन्सने चांगलाच समाचार घेतला. भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर, युवराज सिंग, हरभजन सिंग आणि शिखर धवन यांनी आफ्रिदीला चांगलंच खडसावलं. पण, भारताचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना यानं तर आफ्रिदीला त्याची जागा दाखवली. 

मर्यादा ओलांडू नकोस, अन्यथा तुझी लायकी दाखवून देईन; आफ्रिदीच्या विधानानंतर हरभजन सिंग भडकला

22 कोटींना घेऊन आलास, तरी काश्मीर आमचाच होता अन् राहणार; 'गब्बर'नं आफ्रिदीला खडसावलं

व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या सुरुवातीला आफ्रिदीने कोरोना व्हायरसबाबत बोलत आहे पण त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काश्मीरबाबत बोलत आहे. या व्हिडीओ आफ्रिदी म्हणतो की, ''कोरोनापेक्षा मोठा रोग मोदी यांच्या मनात आणि डोक्यात आहे. तो आजार धर्माचा आहे. त्या आजारावर ते सत्ता चालवत आहेत. आमच्या काश्मिरी लोकांवर अत्याचार करत आहे याचे उत्तर त्यांना द्यावचं लागेल.''

त्याच्या या विधानाचा समाचार घेताना रैना म्हणाला,''सर्व लोकांनी त्यांच्या कामाशी संबंधित बोलायला हवं. विशेषतः जो देश भीक मागून जगत आहे त्यांनी. त्यामुळे तुमच्या अपयशी देशासाठी काहीतरी करा आणि काश्मीरचा मुद्दा सोडून द्या. काश्मिरी असल्याचा मला अभिमान आहे आणि तो नेहमी भारताचा अविभाज्य घटक राहील.''  


 
आफ्रिदीच्या वादानंतर युवी म्हणाला,''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल शाहिद आफ्रिदीनं केलेल्या विधानाबद्दल मी खूप निराश आहे. एक भारतीय म्हणून असं विधान  मी खपवून घेणार नाही. त्याच्या फाऊंडेशनला मदत करण्याचं आवाहन मी माणुसकीच्या नात्यातून केलं होतं. पण, पुन्हा तसं करणार नाही.'' 

सध्याच्या परिस्थितीत IPL 2020 होणं अवघड, BCCIनं मांडलं परखड मत

Web Title: Do something for your failed nation; Suresh Raina hits back at Shahid Afridi svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.