पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाने तयारी सुरू केली आहे. बीसीसीआयने यासाठी युवा खेळाडूंवर भर दिला असला तरी रोहित शर्मा व विराट कोहली यांनी हा वर्ल्ड कप खेळावा असाही एक प्रवाह आहे. येणाऱ्या काळात बीसीसीआय काय निर्णय घेतील, याची सर्वांना उत्सुकता आहे. भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे आणि येथे ट्वेंटी-२० व वन डे वर्ल्ड कप सामन्यांची मालिका खेळणार आहे. मर्यादित षटकांच्या या मालिकेसाठी रोहित व विराट यांना विश्रांती दिली गेलेली आहे.
भारताचा कर्णधार रोहित याने आधीच भारतासाठी शेवटचा ट्वेंटी-२० सामना खेळला असावा अशी अफवा आहे. रोहितने गेल्या वर्षी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत भारताचे नेतृत्व केले होते. २०२३च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही ३६ वर्षीय खेळाडूने भारताचे नेतृत्व केले होते. कोहलीने २०२१ मध्ये भारताच्या ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याची निवड केली. तोही २०२२च्या वर्ल्ड कपनंतर ट्वेंटी-२० सामना खेळलेला नाही.
रोहित आणि कोहलीच्या अनिश्चित भविष्याबद्दल यूट्यूब चॅनेलवर बोलताना, दक्षिण आफ्रिकेचा महान खेळाडू एबी डिव्हिलियर्सने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतीय फलंदाजांना पाठिंबा दिला. "आम्हाला रोहित व विराट यांना तिथे पाहायचे आहे. त्यांना तिथे जाऊन ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकण्याची भूक आहे का? मी त्यांच्या वतीने बोलू शकत नाही, परंतु मला वाटते की ते वर्ल्ड कप खेळतील आणि त्यांना तिथे जाऊन जिंकायचे आहे. ट्वेंटी-२० चा फॉरमॅट शॉर्ट आहे आणि तुम्ही वर्ल्ड कप जिंकण्याची आणखी एक संधी मिळवण्यासाठी स्वत:ला सज्ज करत आहात. त्यामुळे मी त्यांना तिथे खेळताना पाहतो," असे डिव्हिलियर्सने सांगितले.
दुखापतग्रस्त अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत, भारताने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी सूर्यकुमार यादवला कर्णधार म्हणून नियुक्त केले. डिव्हिलियर्सने फलंदाज सूर्यकुमारला ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्याच्या भारताच्या निर्णयाचे स्वागत केले. "सूर्यकुमार यादवला कर्णधारपद देण्याचा भारताचा निर्णय योग्य आहे. तो थोडासा ३६० डिग्री खेळाडू आहे. तो वेगळा विचार करतो आणि थोडा सर्जनशील आहे,'' असे एबी म्हणाला.
Web Title: Do they have the hunger to go there and win the T20 World Cup? AB de Villiers' honest take about T20I future of Rohit Sharma and Virat Kohli
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.