Join us  

Do You Know : महेंद्रसिंग धोनीचे जाहिरात अन् क्रिकेट व्यतिरिक्त 'हे' सात इन्कम सोर्स!

त्याचा नेट वर्थ हा जवळपास 8 अब्ज 35 कोटी इतका आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2020 3:34 PM

Open in App
ठळक मुद्देहॉकी, फुटबॉल आणि रेसिंग स्पर्धांमध्ये धोनीचा संघजाहिरातींतून 195 कोटीहून अधिक उत्पन्न

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज 39वा वाढदिवस साजरा करत आहे. जुलै 2019पासून धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असल्यामुळे यंदाचं वर्ष हे त्याच्या कारकिर्दीचं अखेरचं वर्ष असल्याच्या चर्चा सुरू आहेत. कोरोना व्हायरसमुळे क्रीडा स्पर्धा स्थगित झाल्या असून धोनी त्याच्या कुटुंबीयांसह रांचीतील फार्म हाऊसवर आहे. त्यानं नुकतंच सेंद्रीय शेती करण्यासाठी 8 लाख रुपयांचा ट्रॅक्टर खरेदी केला. क्रिकेटच्या मैदानावर मास्टरमाईंड असलेला धोनी व्यावसायातही तितकाच तल्लख आहे. धोनीनं अनेक व्यावसायांत गुंतवणुक केली आहे आणि त्याचा नेट वर्थ हा जवळपास 8 अब्ज 35 कोटी इतका आहे. 

इंडियन प्रीमिअर लीगमधील फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्सनं धोनीसोबत 15 कोटींचा करार केलेला आहे. धोनी त्याच्या क्रिकेट कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात आहे, परंतु आजही तो अनेक ब्रँड्सची पहिली पसंती आहे. एका वृत्तानुसार जाहिरातींमधून धोनी जवळपास 195 कोटीहून अधिक कमावतो. पण, केवळ जाहीरात आणि क्रिकेट याच्यावर धोनीचे उत्पन्न नाही. त्याच्या कमाईचे सात सोर्स तुम्हाला माहित्येयत का?

  • हॉटेल - धोनीची पत्नी साक्षीनं हॉटेल मॅनेजमेंटचा केलं आहे आणि हॉटेल्स इंडस्ट्रीतही धोनीनं गुतवणुक केली आहे. झारखंड येथे कॅप्टन कूल धोनीचं स्वतःचं हॉटेल आहे आणि त्याचं नाव माही रेजीडेंसी असं आहे.

  • हॉका संघ - हॉकी इंडिया लीगमध्ये रांची रेंजर्स संघाचे मालकी हक्क धोनीकडे आहेत. 2014मध्ये या संघानं रांची रहिंहो या संघाची जागा घेतली होती.
  • फुटबॉल क्लब - इंडियन प्रीमिअर लीगमधील फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं इंडियन सुपर लीगमधील चेन्नईयन एफसी संघातही गुंतवणूक केली आहे. तो या संघाचा सहमालक आहे.

  • एंटरटेनमेंट - धोनीनं गतवर्षी मनोरंजन क्षेत्रात पाऊल टाकले. धोनी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी त्यानं उघडली असून नुकतंच त्यानं मुंबईत ऑफिस सुरु केलं आहे. त्याच्या या कंपनीचा पहिला प्रोजेक्ट हा 'द रोर ऑफ द लायन' हा होता.

  • फॅशन - फॅशनच्या दुनियेतही धोनीनं त्याचा स्वतःचा ब्रँड आणला आहे. सेव्हन या लाईफ स्टाईल ब्रँडमध्ये त्यानं गुंतवणुक केली आहे आणि 2016मध्ये त्याचं लाँचिंग झालं. या ब्रँडच्या फुटवेअरचा धोनी मालक आहे. 
  • रेसिंग टीम - धोनीला बाईक्सची किती क्रेझ आहे ते सांगयला नको. त्यानं साऊतचा सुपरस्टार नागार्जुन याच्यासह सुपरस्पोर्ट वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये माही रेसिंग टीम इंडियाचे मालकी हक्क खरेदी केले आहेत.

  • फिटनेस - जगभरात त्याच्या स्पोर्ट्स फिट नावाच्या 200 जीम आहेत.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

महेंद्रसिंग धोनीला पत्नी साक्षीकडून रोमँटिक शुभेच्छा; सांगितला बर्थ डे प्लान

माही, तो 'टफ कॉल' घ्यायची हीच ती वेळ, कारण...

काश्मीर खोऱ्यात पहारा देणाऱ्या महेंद्रसिंग धोनीचे Unseen Photo व्हायरल!

महेंद्रसिंग धोनीचे 'हे' दहा विक्रम मोडणे अशक्य!

समुद्रात उभं असलेलं लाईटहाऊस पाहिलं की कायम तुझी आठवण येते; केदार जाधवंच भावनिक पत्र

महेंद्रसिंग धोनीला DJ Bravoचं अनोखं गिफ्ट; पाहा भन्नाट गाणं

मुंबई पोलिसांच्या MS Dhoniला काव्यात्मक शुभेच्छा; नावात शोधलं सोशल डिस्टन्सिंग!

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीहॉकीफुटबॉल