ठळक मुद्देवनडेमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारा कर्णधार हा विक्रमही धोनीच्या नावावरच आहे.
भारताचा माजी महान कर्णधार सचिन तेंडुलकरनंतर भारतीय संघात जर कुणाला जास्त मान मिळत असेल तर तो म्हणजे महेंद्रिसिंग धोनी. धोनीने आतापर्यंत एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून नेत्रदीपक कामगिरी केली आहे. धोनीची फलंदाजी आणि यष्टीरक्षण याबाबत साऱ्यांनाच ठाऊक आहे. पण धोनीच्या या दहा विश्वविक्रमांबद्दल मात्र तुम्हाला कदाचित माहिती नसावं, धोनीचे हे 10 विश्वविक्रम तुम्ही जाणून घ्या.
1. आपल्या करीअरच्या सुरुवातीनंतर फक्त 42 सामन्यांनंतर धोनी आयसीसीच्या फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान झाला होता. हा विश्वविक्रम अजूनही कायम आहे.
2. धोनीने 2005 साली जयपूरमध्ये श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात खेळताना नाबाद 183 धावांची खेळी साकारली होती. आतापर्यंत कुठल्या यष्टीरक्षकाला एवढी मोठी खेळी साकारता आलेली नाही.
3. धोनीच्या नावावर सर्वात जास्तवेळा नाबाद राहण्याचाही विश्वविक्रम आहे.
4. धोनी हा चांगला फिनीशर आहे. अखेरच्या षटकांपर्यंत सामना घेऊन जाऊन संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यात धोनी पारंगत आहे. वनडेमध्ये अंतिम चेंडूवर सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रमही धोनीच्याच नावावर आहे.
5. धोनीने 331 सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे, हादेखील एक विश्वविक्रम आहे.
6. आयसीसीच्या तिन्ही मानांकित स्पर्धांचे जेतेपद धोनीने आपण कर्णधार असताना पटकावले आहे. यामध्ये ट्वेन्टी-20 आणि एकदिवसीय विश्वचषक या स्पर्धांच्या जेतेपदाचा समावेश आहे, त्याचबरोबर चॅम्पियन्स करंडकही धोनीने पटकावला होता.
7. वनडेमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारा कर्णधार हा विक्रमही धोनीच्या नावावरच आहे.
8. धोनीने नेतृत्व करत असताना सर्वाधिक ट्वेन्टी-20 सामनेही जिंकले आहेत.
9. वनडेमध्ये सर्वाधिक यष्टीचीत करण्याचा विक्रमही धोनीच्याच नावावर आहे. वनडेमध्ये धोनीने यष्टीमागे 400पेक्षा जास्त बळीही टिपले आहेत.
10. ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्येही यष्ट्यांमागे सर्वाधिक फलंदाजांना बाद करण्याचा विक्रमही धोनीच्याच नावावर आहे.
Web Title: Do you know Dhoni's 10 world records?
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.