नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताकडून खेळणाऱ्या एका खेळाडूने आज निवृत्ती घेतली आहे. या खेळाडूचे वय 42 वर्षे असून त्याने गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताकडून विश्वचषक खेळला होता. आता हा खेळाडू कोण, तुम्हाला माहिती आहे का...
एक अष्टपैलू खेळाडू म्हणून तो सर्वांना परिचीत होता. भारताकडून 57 एकदिवसीय आणि एका ट्वेन्टी-20 सामन्यामध्ये त्याने भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये त्याने 1268 धावा केल्या होत्या.
या खेळाडूने 1995-69 साली पंजाबकडून पदार्पण केले होते. 2003 साली गुवाहाटी येथे झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात या खेळाडूने 159 धावांची दमदार खेळी साकारत संघातील जागेसाठी आपली दावेदारी मजबूत केली होती. पण वर्ल्ड कपनंतर या खेळाडूला जास्त काही करता आले नाही. त्याची कामगिरी वाईट होत गेली आणि त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
या खेळाडूवर आयसीसीने बंदी घालण्याचाही निर्णय घेतला होता. कारण या क्रिकेटपटूने इंडियन क्रिकेट लीगमध्ये प्रवेश केला होता. या लीगला बीसीसीआयची मान्यता नव्हती. त्यामुळे जे खेळाडू या लीगमध्ये खेळत होते, त्या खेळाडूंवर बीसीसीआयने बंदी घातली होती.
गांगुलीच्या नेतृत्वाखाली 2003 च्या विश्वचषकात दिनेश मोंगियाने भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. आज वयाच्या 42व्या वर्षी मोंगियाने आपली निवृत्ती जाहीर केली आहे.
विराट कोहली आणि निवड समितीला घेऊ द्या धोनीच्या निवृत्तीचा निर्णय, 'दादा'चा सल्ला
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा काही केल्या थांबत नाही. त्यात धोनी वारंवार विश्रांतीची विनंती करत असल्यानं या चर्चांना खतपाणी मिळत आहे. वेस्ट इंडिज आणि आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतूनही धोनीनं विश्रांती मागितली. निवड समितीनंही त्याची ही विनंती मान्य केली. त्यामुळे धोनी आता पुढील मालिकेत तरी खेळेल का, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे धोनीनं निवृत्त व्हावे, असाही एक मतप्रवाह निर्माण होत आहे. पण, भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं धोनीच्या निवृत्तीचा निर्णय कर्णधार विराट कोहली व निवड समितीनं घ्यावा, असा सल्ला दिला आहे.
इंग्लंडमध्ये पार पडलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत धोनीला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे त्यानं निवृत्ती घ्यीव अशी मागणी जोर धरत होती. या स्पर्धेनंतर धोनीनं वेस्ट इंडिज दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला आणि 15 दिवस भारतीय सैनिकांसोबत त्यानं जम्मू-काश्मीरमध्ये पहारा दिला. त्यानंतर मायदेशात होणाऱ्या आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतूनही त्यानं विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. या कृतीमुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना वेग आला.
Web Title: Do you know it! Sourav Ganguly-led World Cup player dinesh mongia retires today
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.