National Sports Awards (Marathi News) : Do you Know? - भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी याला आज अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतीय क्रिकेटसाठी त्याने दिलेल्या योगदानाची ही पोचवापती आहे. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर एक स्वप्न पूर्ण झाल्याची प्रतिक्रिया शमीने व्यक्त केली. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत हार्दिकच्या दुखापतीमुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळालेल्या संधीचं शमीनं सोनं केलं आणि सर्वाधिक २५ विकेट्स घेत भारताला फायनलपर्यंत पोहोचवलं होतं. त्यानंतर अर्जुन पुरस्कारासाठी बीसीसीआयने शमीच्या नावाची लेट एन्ट्री भरली आणि आज त्याला राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला गेला. भारतीय पुरुष क्रिकेटपटूंमध्ये अर्जुन पुरस्कार जिंकणारा शमी हा ४६ वा खेळाडू ठरला. पण, या ४६ खेळाडूंमध्ये भारताचा यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) याचे नाव नाही.
अर्जुन पुरस्कार मिळालेल्या महिला क्रिकेटपटू - दीप्ती शर्मा ( २०२०), पूनम यादव ( २०१९), स्मृती मानधना ( २०१८), हरमनप्रीत कौर ( २०१७), झुलन गोस्वामी ( २०१०), अंजुम चोप्रा ( २००६), अंजू जैन ( २००५), मिताली राज ( २००३), संध्या अगरवाल ( १९८६), शुभांगी कुलकर्णी ( १९८५), डायना एडुल्जी ( १९८३), शांता रंगास्वामी ( १९७६)
अर्जुन पुरस्कार मिळालेले पुरुष क्रिकेटपटू - मोहम्मद शमी ( २०२३), शिखर धवन ( २०२१), इशांत शर्मा ( २०२०), रवींद्र जडेजा ( २०१९), चेतेश्वर पुजारा ( २०१७), अजिंक्य रहाणे ( २०१६), रोहित शर्मा ( २०१५), आर अश्विन ( २०१४), विराट कोहली ( २०१३), युवराज सिंग ( २०१२), झहीर खान ( २०११), गौतम गंभीर ( २००९), हरभजन सिंग ( २००३), वीरेंद्र सेहवाग ( २००२), व्ही व्ही एस लक्ष्मण ( २००१), वेंकटेश प्रसाद ( २०००), नयन मोंगिया व राहुल द्रविड ( १९९८), अजय जडेजा व सौरव गांगुली ( १९९७), जवागल श्रीनाथ ( १९९६), अनील कुंबळे ( १९९५), सचिन तेंडुलकर ( १९९४), मनोज प्रभाकर व किरण मोरे ( १९९३), मदन लाल ( १९८९), मोहम्मद अझरुद्दीन ( १९८६), रवी शास्त्री ( १९८४), मोहिंदर अमरनाथ ( १९८२), दीलिप वेंगसरकर ( १९८१), सय्यर किरमानी व चेतन शर्मा ( १९८०), कपिल देव ( १९७९), जी विश्वनाथ ( १९७७), सुनील गावस्कर व बीएस चंद्रशेखर ( १९७२), एस वेंकटराघवन ( १९७१), दीलिप सरदेसाई ( १९७०), बिशन सिंग बेदी ( १९६९), ईएएस प्रसन्ना ( १९६८), अजित वाडेकर ( १९६७), चंदू बोर्डे ( १९६६), विजय मांजरेकर ( १९६५), मन्सुर अली खान पतौडी ( १९६४), सलीम दुराई ( १९६१).
भारताला तीन आयसीसी ट्रॉफी जिंकून देणारा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला अर्जुन पुरस्कार मिळालेला नाही. होय हे खरं आहे... २००७ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जेतेपदानंतर २०११ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धा जिंकण्याचा दुष्काळ संपवला. त्यानंतर २०१३ मध्ये भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली. आयसीसीच्या तीन प्रमुख ट्रॉफी जिंकणारा धोनी हा जगातील एकमेव कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक अविस्मरणीय विजयांचीही नोंद केली. त्याने ९० कसोटींत ४८७६ धावा केल्या आणि त्यात ६ शतकं व ३३ अर्धशतकांचा समावेश आहे. ३५० वन डे सामन्यांत त्याने ५०.५७च्या सरासरीने १०७७३ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये १० शतकं व ७३ अर्धशतकं आहेत. ९७ ट्वेंटी-२०त त्याने १६१७ धावा केल्या आहेत.
महेंद्रसिंग धोनीला का नाही मिळाला अर्जुन पुरस्कार?
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला २००८ मध्ये देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार खेल रत्नने गौरविण्यात आले. त्यानंतर त्याला २००९ मध्ये पद्म श्री व २०१८ मध्ये पद्म भुषण पुरस्कार देण्यात आला. खेल रत्न पुरस्कार जिंकणारा तो पाचवा क्रिकेटपटू आहे. १९९८ मध्ये सचिन तेंडुलकर ( १९९४ अर्जुन पुरस्कार), २००८ मध्ये महेंद्रसिंग धोनी, २०१८ मध्ये विराट कोहली ( २०१३ अर्जुन पुरस्कार), २०२० मध्ये रोहित शर्मा ( २०१५ अर्जुन पुरस्कार) आणि २०२१ मध्ये मिताली राज ( २००३ अर्जुन पुरस्कार) यांना खेल रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. धोनी वगळता सर्वांना आधी अर्जुन पुरस्कार दिला गेला आहे. धोनीला थेट खेल रत्न पुरस्कार दिल्यामुळे त्याला अर्जुन पुरस्कार देता आलेला नाही.
Web Title: Do you Know? Mohammed Shami is the 46th male cricketer to win Arjuna Award, but MS Dhoni didn’t get the Arjuna Award, yes.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.