नवी दिल्ली : गोलंदाजाची शैली कशी असावी, याचे नियम आयसीसीने सांगितले आहेत. त्यानुसार गोलंदाजी करायची असते. पण काही गोलंदाज नियमबाह्य गोलंदाजी करतात आणि त्यानंतर त्यांच्यावर कारवाईही केली जाते. पाकिस्तानच्या एका गोलंदाजाला आता तर सारेच फेकाड्या म्हणायला लागले आहेत. कारण आतापर्यंत तब्बल तीन वेळा त्याला अवैधरीत्या गोलंदाजी केल्यामुळे निलंबित केले आहे. आता चौथ्यांदा पुन्हा एकदा त्याच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.
सध्या पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये सामने सुरु आहेत. या दोन्ही देशांतील एका ट्वेन्टी-20 सामन्यात ही गोष्ट पाहायला मिळाली. मोहम्मद हफिझने एक चेंडू न्यूझीलंडचा फलंदाज रॉस टेलरला टाकला. या चेंडूनंतर थेट टेलरनेच त्याची तक्रार पंचांकडे केली. हफिझला 2014, 2015 आणि 2017 साली आयसीसीने नियमबाह्य गोलंदाजी केल्याबद्दल निलंबित केले होते.
हा पाहा व्हिडीओ