ठळक मुद्देआयपीएलच्या 2017च्या मोसमात पृथ्वीला कोणत्याही संघाने आपल्या ताफ्यात सामील करून घेतले नव्हते. यावर्षी पृथ्वीला मागणी नव्हती.
मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मुंबईच्या पृथ्वी शॉ याला पदार्पण करण्याची संधी देण्यात आहे. आतापर्यंत पृथ्वीने मुंबई आणि भारतीय युवा संघाकडून खेळताना चमकदार कामगिरी केली आहे. पण पृथ्वीच्या या पाच गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का...
दुसरा तेंडुलकर :भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरला अजूनही क्रिकेट विश्व विसरू शकलेलं नाही. तो खेळत नसला तरी एखाद्या खेळाडूमध्ये चाहत्यांना सचिन दिसतो. पृथ्वी हा दुसरा तेंडुलकर आहे, असे बोलायला चाहत्यांनी सुरुवात केली आहे.
युवा संघाचे कर्णधारपद : पृथ्वी हा 2016 सालापासून भारताच्या युवा संघाचा सदस्य आहे. पण त्याला 2018 साली संघाचे कर्णधारपद देण्यात आले. पृथ्वीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विश्वचषक खेळायला उतरला आणि त्यांनी जेतेपदाला गवसणी घातली.
आयपीएलमध्ये संधी : आयपीएलच्या 2017च्या मोसमात पृथ्वीला कोणत्याही संघाने आपल्या ताफ्यात सामील करून घेतले नव्हते. यावर्षी पृथ्वीला मागणी नव्हती. पण त्यानंतर 2018 साली मात्र तब्बल 1.2 कोटी रुपये खर्च करून दिल्लीच्या संघाने पृथ्वीला स्थान दिले.
भारताच्या संभाव्या संघात स्थान : इंग्लंडविरुद्ध अखेरच्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघात काही बदल करण्यात आले. यावेळी पृथ्वीला भारतीय कसोटी संघात स्थान देण्यात आले होते. इंग्लंडच्या दौऱ्यात पृथ्वीला संधी मिळेल, असे वाटत होते. पण हनुमा विहारीला संधी दिली, पण पृथ्वी मात्र खेळण्यापासून वंचित राहिला.
पदार्पण : भारताकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करण्याची संधी पृथ्वीला गुरुवारी मिळणार असल्याचे समजत आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात तो लोकेश राहुलबरोबर सलामीला उतरणार आहे. भारताकडून खेळणारा पृथ्वी हा 293वा खेळाडू ठरणार आहे.
Web Title: Do you know these five things about prithvi Shaw ...
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.