विराट कोहलीच्या बॅटची किंमत तुम्हाला माहित आहे का?

भारतीय कर्णधार विराट कोहली जितका मैदानात त्याच्या खेळीमुळे लोकांच्या लक्षात राहतो तितकाच, मैदानाबाहेर तो त्याच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे लक्षात राहतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2017 08:01 PM2017-08-03T20:01:36+5:302017-08-03T20:02:59+5:30

whatsapp join usJoin us
Do you know Virat Kohli's bat price? | विराट कोहलीच्या बॅटची किंमत तुम्हाला माहित आहे का?

विराट कोहलीच्या बॅटची किंमत तुम्हाला माहित आहे का?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली, दि. 3 - भारतीय कर्णधार विराट कोहली जितका मैदानात त्याच्या खेळीमुळे लोकांच्या लक्षात राहतो तितकाच, मैदानाबाहेर तो त्याच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे लक्षात राहतो. तरुणाईतून विराट कोहलीच्या प्रत्येक स्टाईलला खूप मोठा प्रतिसाद मिळतो. पण सध्या तो मैदानात वापरत असलेली बॅट चांगलीच चर्चेत आहे. तिन्ही प्रकराच्या क्रिकेटमध्ये विराट कोहली खोऱ्याने धावा काढतो. कसोटी, टी 20 आणि वनडेमध्ये विराटची सरासरी तब्बल 50 पेक्षा जास्त आहे. ज्या बॅटने विराट ह्या धावा काढतो तिची किंमत किंमत ऐकून अवाक व्हाल.

क्रिकवीझ्झ वेबसाइटच्या वृत्तानुसार विराट कोहली हा इंग्लिश विल्लोवच्या अ प्रकारातील बॅट वापरतो. जिची अंदाजे किंमत ही 20, 000 रुपयांपर्यंत आहे. या बॅटची किंमत ही तिच्यावर असणाऱ्या रेषा ठरवते. ह्या रेषांचा उपयोग मुख्यत्वे चांगला फटका मारण्यासाठी होतो. 6 ते 12 रेषा असलेली बॅट ही क्रिकेटमध्ये उच्च दर्जाची समजली जाते. भारतीय कर्णधार वापरात असलेली बॅट ही 8 ते 12 रेषांची आहे. तिची अंदाजे किंमत ही 17 हजार ते 23 हजार रुपयांच्या दरम्यान आहे.

विराट सध्या बॅटवर लावत असलेल्या एमआरफ कंपनीच्या जाहिरातीसाठी वर्षाला 8 कोटी रुपये मोजतो. यापूर्वी बॅटसाठी वापरण्यात येणाऱ्या जाहिरातीसाठी भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी सर्वात जास्त पैसे घेत असे परंतु सध्या विराट हा यासाठी सर्वात जास्त पैसे घेतो.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली तब्बल सहाशे रुपये प्रतिलीटर दराने विकलं जाणारं पाणी पितो. गेल्या काहीं दिवसांपूर्वी ही माहिती समोर आली होती.

Web Title: Do you know Virat Kohli's bat price?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.