भारताचे पहिले कसोटी शतकवीर कोण, तुम्हाला माहित आहेत का?

इंग्लंड दौऱ्यावर भारतीय फलंदाज सपशेल शरणागती पत्करताना आपण पाहत आहोत. असे काही अपवाद वगळता भारतीय फलंदाजांनी भल्याभल्या प्रतिस्पर्धी गोलंदाजांची पळता भुई केली आहे. आत्तापर्यंत भारताच्या 81 फलंदाजांनी एकूण 496 शतकं झळकावली आहेत. पण, तुम्हाला माहित आहे का भारतासाठी पहिले कसोटी शतक कोणी झळकावले होते?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 01:33 PM2018-09-11T13:33:37+5:302018-09-11T13:34:03+5:30

whatsapp join usJoin us
do you know, who was India's first test centurion? | भारताचे पहिले कसोटी शतकवीर कोण, तुम्हाला माहित आहेत का?

भारताचे पहिले कसोटी शतकवीर कोण, तुम्हाला माहित आहेत का?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई - इंग्लंड दौऱ्यावर भारतीय फलंदाज सपशेल शरणागती पत्करताना आपण पाहत आहोत. असे काही अपवाद वगळता भारतीय फलंदाजांनी भल्याभल्या प्रतिस्पर्धी गोलंदाजांची पळता भुई केली आहे. भारताच्या फलंदाजांचा प्रतिस्पर्धींवर आजही पूर्वीसारखाच दरारा आहे. धावांच्या बाबतीत भारतीय फलंदाज आघाडीवर आहेत. त्यामुळेच आकड्यांच्या खेळाची नेहमीच क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता असते. शतकांच्या आकड्यांतही भारतीय खेळाडू अग्रेसर आहेत. आत्तापर्यंत भारताच्या 81 फलंदाजांनी एकूण 496 शतकं झळकावली आहेत. पण, तुम्हाला माहित आहे का भारतासाठी पहिले कसोटी शतक कोणी झळकावले होते? 

महान फलंदाज सचिन तेंडुलकर याच्या नावावर सर्वाधिक 51 कसोटी शतकांचा विक्रम आहे. पण, भारताकडून पहिले कसोटी शतक झळकावण्याचा मान लाला अमरनाथ यांना जातो. त्यांनी पदार्पणातच इंग्लंडविरुद्ध 118 धावांची खेळी साकारली होती. लाला अमरनाथ यांची आज 107वी जयंती आहे. 11 ऑगस्ट 1911 साली पंजाबमधील कपूरथला येथे त्यांचा जन्म झाला होता. लाला अमरनाथ यांच्या नेतृत्वाखील भारताने पाकिस्तानविरुद्ध पहिली कसोटी मालिका ( 1952-53) जिंकली होती. 



लाला अमरनाथ यांनी 17 डिसेंबर 1933 साली कसोटीतील पहिले शतक झळकावले होते. 22व्या वर्षी त्याने कसोटीत पदार्पण केले आणि मुंबईत झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात दुसऱ्या डावात त्यांनी 185 मिनिटे खेळपट्टीवर तग धरून 21 चौकारांच्या साहाय्याने 118 धावा केल्या होत्या. भारताला तो सामन्या चौथ्या दिवशीच गमवावा लागला होता. लाला अमरनाथ यांच्या कारकिर्दीतले ते एकमेव शतक ठरले. त्यांनी 24 कसोटी सामन्यांत 878 धावा केल्या आणि 45 विकेटही घेतल्या.  


त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र सुरिंदर आणि मोहिंदर अमरनाथ यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. अमरनाथ कुटुंबीयांच्या नावावर एकूण 13 कसोटी शतकं आहेत. मोहिंदर यांनी 11 तर सुरिंदर यांनी एकमेव शतक झळकावले. अमरनाथ परिवारानंतर ऑस्ट्रेलियाच्या मार्श कुटुंबीयांवर 12 शतकं आहेत. त्यात वडिल ज्योफ मार्श 4, पुत्र शॉन आणि मिशेल यांच्या नावावर अनुक्रमे 6 व 2 कसोटी शतकं आहेत. 

Web Title: do you know, who was India's first test centurion?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.