मुंबई, आयपीएल 2019 : रोहित शर्माचे नेतृत्व कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीवर भारी पडले. इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या मोसमात मुंबई इंडियन्सने अवघ्या एका धावेने जेतेपदाला गवसणी घातली. या विजयाबरोबर आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी कर्णधार होण्याचा मान रोहितने पटकावला. कर्णधार म्हणून त्यानं आयपीएलची चार जेतेपद पटकावलेली आहेत आणि खेळाडू म्हणून त्याचे हे पाचवे जेतेपद आहे. मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी अखेरपर्यंत झुंज देण्याची वृत्ती ठेवल्याने हे यश मिळवू शकते. शिवाय अंक शास्त्राचीही त्यांना साथ होतीच. अंकशास्त्रानुसार यदाचे जेतेपद हे मुंबई इंडियन्सनेच होते, जाणून घेऊया कसे.
रोहितला आयपीएलच्या अंतिम सामन्यात एकदाही पराभव पत्करावा लागलेला नाही आणि असा विक्रम करणारा तो एकमेव खेळाडू आहे. रोहितने डेक्कन चार्जर्सकडून 2009 मध्ये आयपीएलचा चषक उंचावला होता. त्यानंतर मुंबई इंडियन्सकडून त्यानं ( 2013, 2015, 2017 व 2019 ) चार जेतेपदं जिंकली. जेतेपदांच्या सालावर लक्ष दिल्यास लक्षात येईल की एक वर्षाच्या गॅपनंतर मुंबईने बाजी मारली आहे. त्यामुळे यंदाही त्यांचेच नाणं खणखणीत वाजेल यात कुणालाही शंका नव्हती. रोहितनं कालच्या जेतेपदानंतर महेंद्रसिंग धोनीशी आणखी एका बाबतीत बरोबरी केली. धोनीनं अविवाहीत, पती आणि बाप अशा तीनही भूमिकेत असताना आयपीएल चषक उंचावला, रोहितनेही हीच कामगिरी करून दाखवली.
( IPL 2019 : डेव्हिड वॉर्नर मुंबई इंडियन्सचा 'लकी बॉय', जाणून घ्या कसा! )या व्यतिरिक्त मुंबईने आयपीएलच्या ज्या हंगामात 110 पेक्षा अधिक षटकार खेचले, त्यात त्यांनी बाजी मारली आहे. 2019मध्ये त्यांच्या नावावर एकूण 115 षटकार जमा आहेत. अन्य तीन जेतेपदांचा विचार केल्यास त्यांनी 2017 मध्ये 117 षटकार, 2015 मध्ये 120 षटकार आणि 2013 मध्ये 117 षटकार खेचले आहेत.