भारतात कोरोनाची दुसरी लाट आली आहे आणि दररोज ३ ते साडेतीन लाख नव्या रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांवर प्रचंड ताण पडला आहे आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लोकांना जीव गमवावा लागत आहे. आयपीएल २०२१ स्थगित झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतात अडकून पडले आहेत. १५ मे पर्यंत भारतातून येणाऱ्या विमान वाहतुकीवर ऑस्ट्रेलियन सरकारनं बंदी घातली आहे. त्यामुळे ऑसी खेळाडू आता मालदीव किंवा श्रीलंकेत आसरा घेण्याचा पर्याय शोधत आहेत. त्याचवेळी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनचे मुख्य कार्यकारी टॉड ग्रीनबर्ग यांनी खेळाडूंना झापले आहे. यापुढे परदेशात ट्वेंटी-२० लीग खेळण्यासाठीचा करार करताना गृहपाठ करा, असा सल्ला देताना त्यांनी खेळाडूंचे कान टोचले. भारतात IPL 2021 आयोजन करण्याच्या निर्णयाचं सौरव गांगुलीनं केलं समर्थन; स्थगितीनंतर करावा लागतोय आव्हानांचा सामना
खेळाडू, ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक आणि समालोच असे एकूण जवळपास ४० जणं भारतात अडकली आहेत. ग्रीनबर्ग यांनी सांगितले की, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा सेंट्रल करार, राज्यांचा करार आणि फ्रिलान्सर असे करार असलेले खेळाडू परदेशात विविध लीगमध्ये खेळत आहेत. या सर्वांना क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून ना हरकत प्रमाणपत्र लागतं, परंतु खेळाडू त्यांचा निर्णय स्वतः घेतात. ख्रिस लीन, डॅन ख्रिस्टीयन व बेन कटींग यांनी या वर्षाच्या सुरूवातीला पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळताना नियम मोडले होते. जोश हेझलवूड, मिचेल मार्श आणि जोश फिलीप यांनी बायो बबलला कंटाळून आयपीएलमधून माघार घेतली. त्यानंतर अँड्य्रू टाय, केन रिचर्डसन आणि अॅडम झम्पा हे भारतातील कोरोना परिस्थिती बिघडताना पाहून मायदेशात परतले. विराट कोहली कोरोनाविरुद्धच्या लढ्यात युवा सेनेसह उतरला मैदानावर; IPL 2021 स्थगितीनंतर लागला कामाला
''भविष्यात परदेशात लीग खेळताना अभ्यास केल्याचा फायदा खेळाडूंना नक्की होईल. कोरोनामुळे आपल्या डोळ्यादेखत जग बदलत चालले आहे. त्यामुळे खेळाडूंनी गृहपाठ करायला हवा,''असे ग्रीनबर्ग म्हणाले.
ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या परतीसाठी बीसीसीआय मदत करणार
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकले यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी चार्टर्ड विमानाची व्यवस्था करीत असल्याचे बुधवारी सांगितले. भारतात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाने प्रवासावर बंदी असल्यामुळे या खेळाडूंना मायदेशी परतण्याआधी मालदीव अथवा श्रीलंकेत थांबावे लागण्याची शक्यता आहे. मानलं MS Dhoni ला; संघातील प्रत्येक खेळाडू रवाना झाल्यानंतरच रांचीला जाणार कॅप्टन कूल
हॉकले यांनी सिडनीत पत्रकारांशी बोलताना म्हटले, ‘सध्या बीसीसीआयचे लक्ष हे ऑस्ट्रेलियाच नव्हे तर सर्वच खेळाडूंना सुरक्षित घरी पोहोचण्यावर आहे. ते खेळाडूंसाठी अनेक पर्यायावर काम करीत आहेत. आता मालदीव व श्रीलंकेला निवडले आहे. बीसीसीआय त्यांना मायदेशी पाठवण्यासाठी कटिबद्ध आहे.’ कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद व चेन्नई सुपर किंग्समध्ये कोरोना संक्रमणाची प्रकरणे समोर आल्यानंतर मंगळवारी आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित झाली.
Web Title: Do your homework before signing up for T20 leagues - ACA to Australia players
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.