Doctor Rohit Sharma, IND vs ENG : १० विकेट्स राखून पहिली वन डे जिंकणाऱ्या भारतीय संघाला दुसऱ्या सामन्यात १०० धावांनी हार मानावी लागली. इंग्लंडच्या २४६ धावांचा पाठलाग करणारा भारतीय संघ १४६ धावा करू शकला. रिसे टॉप्लीने २४ धावांत ६ विकेट्स घेत इंग्लंडच्या विजयात मोठा वाटा उचलला अन् मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. या सामन्यात रोहितने दुखापतीमुळे काही काळ मैदान सोडले होते आणि उपचारानंतर तो पुन्हा मैदानावर आला होता. दरम्यान, या सामन्यातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे आणि त्यातून आपला हिटमॅन रोहित 'ऑर्थोपेडिक डॉक्टर' असल्याची चर्चा सुरू झाली आहे. नेटिझन्सने तसे काही पुरावेही दिले आहेत.
लॉर्ड्सवर झालेल्या सामन्यात इंग्लंडच्या डावात क्षेत्ररक्षण करताना रोहितचा खांदा निखळला. फिजिओला मैदानावर बोलवण्याऐवजी रोहितने स्वत: खांदा रिलोकेट केला. रोहितला हे करताना पाहून चाहत्यांना आश्चर्य वाटले. त्यानंतर सोशल मीडियावर रोहित डॉक्टर असल्याची चर्चा सुरू झाली. एका युजरने तर Dr Rohit Sharma Orthopedist असे शोधून काढले आणि तो फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यावर त्याने लिहिले की, "आश्चर्यचकीत होऊ नका, कारण तो स्वतःच ऑर्थोपेडिक आहे."
रिसे टॉप्ली ( Reece Topley) याने आज भारतीय फलंदाजांची शाळा घेतली.
रोहित शर्मा, शिखर धवन, सूर्यकुमार यादव व रवींद्र जडेजा या चार फलंदाजाना त्याने माघारी पाठवले. इंग्लंडच्या २४७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. निम्मा संघ ७३ धावांवर माघारी परतल्याने भारत अर्धी लढाई तेथेच हरला होता. तरीही हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा यांच्याकडून आशा होत्या. मात्र, धावा व चेंडू यांच्यातली दरी एवढी वाढली की तेही हतबल झाले. इंग्लंडने दुसरी वन डे जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली.
Web Title: Doctor Rohit Sharma, IND vs ENG : Rohit Sharma turns out to be 'Orthopedic Doctor'; The secret came out in the second ODI against England, know exact what happened
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.