साऊथम्पटन : ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध विश्वकप स्पर्धेतील सराव सामन्यात १२ धावांनी मिळवलेल्या विजयात स्टीव्ह स्मिथला प्रेक्षकांच्या हुटिंगला सामोरे जावे लागले, पण या माजी कर्णधाराने त्याचा फरक पडत नसल्याचे म्हटले आहे. चेंडू छेडखानी प्रकरणात एक वर्षाच्या निलंबनाच्या कारवाईला सामोरे गेल्यानंतर स्मिथ प्रथमच इंग्लंडमध्ये सामना खेळला. त्यात त्याने ११६ धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे आॅस्ट्रेलियाने विश्वचषक स्पर्धेचा यजमान व जेतेपदाचा प्रबळ दावेदार इंग्लंडचा पराभव केला.
स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांची सामन्यादरम्यान प्रेक्षकांनी जोरदार हुटिंग केली. स्मिथने ज्यावेळी अर्धशतक व शतक पूर्ण केले त्यावेळी त्याला प्रेक्षकांच्या हुटिंगला सामोरे जावे लागले. स्मिथ म्हणाला, ‘प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचे आणि कुणासोबत कसे वर्तन करायचे याचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे मला कुठला फरक पडत नाही. त्याची मला चिंता नाही. मी त्याकडे लक्षही देत नाही.’
माझे व वॉर्नरचे सहकाऱ्यांनी स्वागत केले, असेही स्मिथ म्हणाला. तो म्हणाला, ‘संघातून आम्ही बाहेर गेलोच नाही, अशा पद्धतीचे ते स्वागत होते. ड्रेसिंग रुममधून मला माझ्या सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळत आहे, याची मला कल्पना आहे आणि माझ्यासाठी ते सर्वांत महत्त्वाचे आहे.’
>आपल्या फॉर्मबाबत बोलताना स्मिथ म्हणाला,‘मी फॉर्मला अधिक महत्त्व देत नाही. हा केवळ सराव सामना आहे. खºया लढतीतही हाच फॉर्म कायम राहील, अशी आशा आहे. सराव सामन्यात चांगली कामगिरी झाल्यामुळे आनंद झाला. आॅस्ट्रेलियासाठी शतक झळकावणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.’
Web Title: 'Does not matter to the audience' hunt '
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.