नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियमक बोर्डाने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यात रणजी स्पर्धेचे २०२१-२२ चे सत्र पाच जानेवारी ते २० मार्च या कालावधीत होईल. कोविड १९ मुळे गेल्या सत्रात रणजी चषकाचे आयोजन करण्यात आले नव्हते. कारण ३८ संघांसाठी बायोबबल तयार करण्यात अनेक अडचणी येत होत्या.
रणजी चषक बीसीसीआयकडून या सत्रात खेळवली जाणार आहे. तर वरिष्ठ गटातील क्रिकेटला २८ ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. पहिली स्पर्धा ही सैयद मुश्ताक अली ट्रॉफी असेल. आयपीएलनंतर या स्पर्धेचे आयोजन केले जाईल. त्यातून सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू उपलब्ध होत असतात. विजय हजारे चषक (राष्ट्रीय एकदिवसीय) ही स्पर्धा १ ते २९ डिसेंबरपर्यंत खेळवली जाणार आहे. तर वरिष्ठ महिला संघांची पहिली मालिका राष्ट्रीय वनडे २० ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर दरम्यान होईल.
सत्रात महिला आणि पुरुषांची १९ वर्षाखालील एकदिवसीय मालिका विनू मकंड स्पर्धा २० सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. त्यानंतर महिला आणि पुरुषांसाठी १९ वर्षाखालील चॅलेंजर चषक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. २५ वर्षांखालील एकदिवसीय स्पर्धांचे आयोजन ९ नोव्हेंबर ते १० डिसेंबर दरम्यान होईल.
- ग्रुप वरिष्ठ पुरुष स्पर्धा रणजी चषक विजय हजारे चषक आणि सैयद मुश्ताक अली चषकासाठी ३८ संघ हे सहा गटात विभाजन केले जाईल. सहा संघांचे पाच एलिट ग्रुप असतील तर आठ संघ हे एका प्लेट ग्रुपमध्ये असतील. २५ वर्षांखालील सहा संघ पाच एलिट ग्रुपमध्ये असतील, तर सात संघ एका प्लेटमध्ये असतील.