पाकिस्तानात कोरोना व्हायरसचे साडेपाच हजाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत. पाकिस्तानातील अनेक प्रांतात लॉकडाऊन केलं गेलं आहे. त्यामुळे तेथील गरजूंवर उपासमारीची वेळ आली आहे आणि त्यांना शाहिद आफ्रिदी फाऊंडेशन जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करत आहे. पाकिस्तानचा माजी अष्टपैलू शाहिद आफ्रिदीच्या या समाजकार्याला भारताचा माजी फलंदाज युवराज सिंग आणि फिरकी गोलंदाज हरभजन सिंग यांनी पाठिंबा दिला होता. युवी आणि भज्जी यांनी आफ्रिदीच्या फाऊंडेशनला मदत करण्याचं आवाहनही केलं होतं. त्यावरून नेटिझन्सनी युवी आणि भज्जी यांच्यावर टीका केली. त्यावरून आफ्रिदीनं भारतीयांचे कान टोचले.
आफ्रिदी म्हणाला,''युवराज सिंग नेहमी मानवतावादी आहे आणि माझा त्याला नेहमी पाठिंबा असेल. त्याच्या या समाजकार्याला सहकार्य करावं, असं मी भारतीयांना आवाहन करतो. त्यानं भारतासाठी खुप केलं आहे आणि आता त्याला तुमच्याकडून मदतीची गरज आहे.''
पण, यावेळी आफ्रिदीनं युवी व भज्जीवर टीका करणाऱ्यांना खोचक टोमणाही मारला. तो म्हणाला,''मी कॅनडात होतो, तेव्हा युवराज सिंगच्या फाऊंडेशनला मी मदत केली आणि 10 हजार डॉलरचा निधीही दिला. पाकिस्तानातील प्रत्येकानं माझ्या या कृतीचं स्वागत केलं. मी युवीला मदत का केली, तू भारताला का मदत करतोस, असा सवाल मला कोणी केला नाही.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या
धक्कादायक; Corona Virus मुळे पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटू जाफर सर्फराजचा मृत्यू
भारतातील लोकांना कचऱ्यातून अन्न निवडून खाताना पाहतोय; शाहिद आफ्रिदीनं ओलांडल्या मर्यादा