Join us  

T20 World Cup: "टी-२० वर्ल्डकपसाठी पाकच्या संघ निवडीवर सहमत नाही, पण...", शाहिद आफ्रिदीनं मांडलं रोखठोक मत

T20 World Cup: पाकिस्तानचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनं आगामी ट्वेन्टी-२० वर्ल्डकपसाठीच्या पाकिस्तानच्या संघ निवडीवर नाराजी व्यक्त केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 3:24 PM

Open in App

T20 World Cup: पाकिस्तानचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनं आगामी ट्वेन्टी-२० वर्ल्डकपसाठीच्या पाकिस्तानच्या संघ निवडीवर नाराजी व्यक्त केली आहे. तरीही संघाला पाठिंबा देणं हे आपलं कर्तव्य असल्याचंही तो म्हणाला आहे. 

फकर झमान, सरफराज अहमद आणि शोएब मलिक या तीन महत्त्वाच्या खेळाडूंना पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं टी-२० वर्ल्डकपसाठीच्या पाकिस्तानच्या १५ सदस्यीय क्रिकेट संघात स्थान दिलेलं नाही. पाक निवड समितीच्या या निर्यणावर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनी टीका केली आहे. त्यात आता शाहिद आफ्रिदीनंही आपली नाराजी व्यक्त केली आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून संघात काही बदल केले जाण्याची शक्यता देखील आहे. कारण संघात  शेवटचा बदल करण्यासाठी १० ऑक्टोबरपर्यंतचा वेळ आयसीसीनं दिल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून पुन्हा एकदा संघात बदल केले जाऊ शकतात. 

आफ्रिदी नेमकं काय म्हणाला?"ट्वेन्टी-२० वर्ल्डकपसाठी पाकिस्तानच्या संघात ठराविक खेळाडूंचीच निवड का झाली आणि काही जणांना संघाबाहेर का करण्यात आलं यामागचं मला कारण काही कळत नाहीय. पण लवकरच संघात बदल केले जाणार असल्याचीही माहिती मला कळाली आहे. वैयक्तिकरित्या सध्या निवडण्यात आलेला संघ योग्य नाही. संघात दोन ते तीन बदल आवश्यक आहेत. त्यामुळे मी नक्कीच सध्याच्या संघाबाबत सहमत नाही. पण संघ देशाचं प्रतिनिधीत्व करतोय. त्यामुळे वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानच्या संघाला पाठिंबा देणं हे आपलं कर्तव्य आहे", असं शाहिद आफ्रिदी म्हणाला. 

पाकिस्तान निवड समितीनं ट्वेन्टी-२० वर्ल्डकपसाठीच्या पाकिस्तानच्या संघाचं नेतृत्त्व बाबर आझमकडे दिलं आहे. तर संघात मोहम्मद रिझवान, शाहिन शाह आफ्रिदी आणि मोहम्मद हाफिजसारख्या महत्त्वाच्या खेळाडूंचा समावेश असणार आहे. याशिवाय संघात युवा क्रिकेटपटूंना स्थान देण्यात आलं आहे. पाकिस्तानचा माजी फलंदाज मॅथ्यू हेडन याची ट्वेन्टी-२० वर्ल्डकपसाठी पाकिस्तानच्या संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :आयपीएल २०२१शाहिद अफ्रिदीपाकिस्तानट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१
Open in App