लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : क्रिकेटविश्वात सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त Indian Premier League (IPL 2020)ची. क्रिकेट खेळणाºया प्रत्येक देशात सुरु आहे ते फक्त आयपीएल. यास अपवाद एका देशाचा आणि तो देश म्हणजे पाकिस्तान. भारतासोबत बिघडलेले राजकीय संबंध आणि सतत सीमारेषेवर करणाºया कुरघोड्या यामुळे पाकिस्तानला आयपीएलमधी बंदी आहे. मात्र असे असले, तरी तेथील क्रिकेटप्रेमींचे आणि खेळाडूंचेही लक्ष आयपीएलकडे आहे. पाकिस्तानमध्ये भारतीय खेळाडूंची क्रेझही मोठी आहे. आता तर पाकिस्तानच्या युवा क्रिकेटपटूने भारतीय खेळाडूशी स्वत:ची झालेली तुलना पाहून प्रतिक्रिया करत आपले लक्ष वेधले आहे.
पाकिस्तानचा युवा फलंदाज हैदर अली (Haidar Ali) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून आपली छाप पाडली. पहिल्याच आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात दमदार अर्धशतक झळकावून त्याने भविष्यातील स्टार खेळाडू म्हणून छाप पाडली. त्याचवेळी, त्याच्या या एका खेळीच्या जोरावर अनेकांनी त्याची तुलना भारताचा ‘हिटमॅन’ रोहित शर्माशी (Rohit Sharma) केली.
यावर प्रतिक्रिया देताना अलीने, माझी तुलना रोहितसोबत करणे योग्य नसल्याचे सांगितले. अली म्हणाला की, ‘रोहित टॉपचा फलंदाज आहे. त्यामुळे त्याच्याशी झालेली माझी तुलना मला बरोबर वाटत नाही. आमच्यामध्ये कोणतीच तुलनात होऊ शकत नाही. त्याने याआधीच खूप काही यश मिळवले आहे.’
हैदर पुढे म्हणाला की, ‘मी अनेक महान फलंदाजांचे व्हिडिओ पाहून शिकलोय. रोहित शर्माच्या फलंदाजीचे व्हिडिओ पाहूनही खूप शिकलो. त्याच्या फलंदाजीतून टीप्सही घेतल्या आहेत.’
Web Title: Don't compare me with Rohit Sharma; Reaction of Pakistani cricketer Haidar Ali
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.