Join us  

पृथ्वीची तुलना सचिन तेंडुलकरशी; विराटची चाहत्यांना 'धमकी'

पहिल्याच खेळीनंतर पृथ्वीची तुलना थेट मास्टर-ब्लाटर सचिन तेंडुलकरशी केली जात आहे. पण भारताचा कर्णधार विराट कोहलीला मात्र ही गोष्ट मान्य नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 6:19 PM

Open in App
ठळक मुद्देपहिल्या सामन्यात पृथ्वीने 154 चेंडूंत 19 चौकारांच्या मदतीने 134 धावांची खेळी साकारली होती.

मुंबई : आपल्या पहिल्याच सामन्यात शतक झळकावून पृथ्वी शॉ याने बऱ्याच जणांची मने जिंकली आहेत. पहिल्याच खेळीनंतर पृथ्वीची तुलना थेट मास्टर-ब्लाटर सचिन तेंडुलकरशी केली जात आहे. पण भारताचा कर्णधार विराट कोहलीला मात्र ही गोष्ट मान्य नाही.

दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी कोहली म्हणाला की, " पृथ्वी हा आता फक्त फक्त एकच कसोटी सामना खेळला आहे. त्यामुळे त्याची कोणत्याही खेळाडूशी तुलना करणे योग्य नाही. आता त्याला बरेच काही शिकायचे आहे आणि अजून बरेच मैलाचे दगड गाठायचे आहे. ही त्याची फक्त सुरुवात आहे. "

पृथ्वीकडून असलेल्या अपेक्षा कोहलीने यावेळी सांगितल्या. कोहली म्हणाला की, " पहिल्या सामन्यात पृथ्वीने चांगली कामगिरी केली. त्याच्याकडून यापुढेही अशाच कामगिरीची अपेक्षा आम्हाला आहे. यापुढेही त्याने कामगिरीत सातत्य राखायला हवे. तो एक चांगला विद्यार्थी आहे. परिस्थिती कशी हाताळायची, हे तो योग्यपणे जाणतो. त्यामुळे त्याच्याकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. "

पहिल्या सामन्यात पृथ्वीने 154 चेंडूंत 19 चौकारांच्या मदतीने 134 धावांची खेळी साकारली. पदार्पणात सामनावीर पुरस्कार जिंकणारा पृथ्वी हा सहावा भारतीय खेळाडू ठरला. याआधी प्रविण अमरे ( 1992), आर पी सिंग ( 2006), आर अश्विन ( 2011), शिखर धवन ( 2013) आणि रोहित शर्मा ( 2013) यांनी पदार्पणात सामनावीर पुरस्कार जिंकला होता.

टॅग्स :पृथ्वी शॉसचिन तेंडुलकरविराट कोहली