मेलबोर्न : आयपीएल १४ व्या पर्वाच्या लिलावात ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय आणि टी-२० संघाचा कर्णधार तसेच धडाकेबाज सलामीवीर अॅरोन फिंच याला एकाही संघाने खरेदी न केल्याचा मुद्दा गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत आहे. फिंचवर एकाही संघाने बोली न लावल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क याने यापूर्वीदेखील आश्चर्य व्यक्त केले होते. बुधवारी पुन्हा एकदा क्लार्कने याविषयी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याने फिंचला एका विधानावरून सुनावले.
आयपीएलमध्ये कोणत्याही संघाने खरेदी न केल्यानंतर “बिग बॅश लीगमधील खराब कामगिरीमुळे आयपीएल लिलावात माझ्यावर बोली लागणार नाही याची मला अपेक्षा होती”, असे फिंच म्हणाला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना क्लार्कने फिंचला चांगलेच धारेवर धरले. तो म्हणाला, ‘तू ऑस्ट्रेलियाच्या संघाचा कर्णधार आहेस, आयपीएलमध्ये प्रत्येक संघ तुला त्यांच्या ताफ्यात आणण्याचा प्रयत्न करेल अशीच अपेक्षा तू ठेवायला हवी,’ असे क्लार्क म्हणाला.
“मी त्या दिवशीही म्हटले होते की एकाही संघाने फिंचवर बोली लावली नाही, आणि त्यावर मला हे अपेक्षित होते. टी-२० प्रकारात तू ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आहेस. प्रत्येक संघाला तू त्यांच्या सघात हवाय असाच विचार तू करायला पाहिजे”, अशा शब्दात क्लार्कने ‘बिग स्पोर्ट्स ब्रेकफास्ट’ कार्यक्रमात बोलताना फिंचच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली.
फिंचला मागच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्सकडून खेळताना छाप पाडता आली नव्हती. त्यामुळे यावेळी लिलावात रॉयल चॅलेंजर्सने फिंचला रिलीज केले होते. त्यानंतर एकाही संघाने त्याच्यावर बोली लावली नाही.
Web Title: Don't forget that you are the captain of Australia; Michael Clarke angry on Aaron Finch
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.