अखेरच्या घटकात विजयासाठी २९ धावांची गरज असताना रिंकू सिंगने वेगवान गोलंदाज यश दयालला सलग पाच षटकार खेचले. रिंकूच्या या तडाख्याच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने हातातून गेलेला सामना जिंकताना गुजरात टायटन्सला तीन गड्यांनी नमवले. यासह कोलकाताने गुजरातला विजयी हॅटट्रिकपासून दूर ठेवले. विशेष म्हणजे, गुजरातचा हंगामी कर्णधार राशीद खानने घेतलेली हॅटट्रिकही रिंकूपुढे वाया गेली.
रिंकूच्या या खेळीसोबत गुजरात टायटन्सचा गोलंदाज यश दयालची देखील चर्चा रंगली आहे. मात्र याचदरम्यान कोलकात नाइट रायडर्सने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे ट्विट करत त्याला आधार दिला आहे. चिन अप, लैड...अशी कठीण वेळ सर्वोतकृष्ट खेळाडूवरही येऊ शकते. हिंमत हारु नको, तु एक चॅम्पियन आहेस..आणि तू मजबूत पुनरागमन करशील, असं केकेआरने आपल्या ट्विटद्वारे म्हटलं आहे. केकेआरचं हे ट्विट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांना, चाहत्यांना देखील केकेआरचं हे ट्विट भावलं आहे.
५ चेंडूत ५ षटकार ठोकत रिंकू सिंगने नोंदवले ५ विक्रम; ते नेमके कोणते आहेत?, जाणून घ्या...!
इम्पॅक्ट प्लेअर वेंकटेश अय्यरने चांगली फलंदाजी करताना कोलकाता नाइट रायडर्सला विजयाच्या उंबरठ्यावर आणली होती. पण, गुजरातचा कर्णधार राशीद खानने हॅटट्रिक घेताना मॅच फिरवली. ६ चेंडूंत २९ धावा हव्या असताना कोलकाता हा सामना जिंकेल, असे कोणालाही वाटले नव्हते. रिंकू सिंगला उमेश यादवने एक धाव घेत स्ट्राईक दिली. त्यानंतर रिंकून १,२,३ नव्हे तर सलग पाच षटकार खेचले अन् कोलकाताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी रिंकूला मिठी मारली अन् त्यांच्या डोळ्यांत पाणी दाटून आले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: 'Don't give up, you are a champion'; KKR's tweet for Yash Dayal, netizens were very impressed!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.