Harbhajan Singh: केएल राहुलची खिल्ली उडवू नका! व्यंकटेश प्रसाद-आकाश चोप्रा वादात हरभजनची उडी

Harbhajan Singh on KL Rahul: सध्या भारताच्या दोन माजी क्रिकेटपटूंमधील वाद चर्चेत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 07:55 PM2023-02-23T19:55:05+5:302023-02-23T19:57:02+5:30

whatsapp join usJoin us
Don't make fun of KL Rahul, Harbhajan Singh reacts to Venkatesh Prasad and Akash Chopra controversy   | Harbhajan Singh: केएल राहुलची खिल्ली उडवू नका! व्यंकटेश प्रसाद-आकाश चोप्रा वादात हरभजनची उडी

Harbhajan Singh: केएल राहुलची खिल्ली उडवू नका! व्यंकटेश प्रसाद-आकाश चोप्रा वादात हरभजनची उडी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : सध्या भारताच्या दोन माजी क्रिकेटपटूंमधील वाद चर्चेत आहे. व्यंकटेश प्रसाद आणि आकाश चोप्रा हे ट्विटरवर आमनेसामने आहेत. सध्या दोघांमध्ये वाद सुरू आहे. खरं तर भारतीय संघाचा सलामीवीर लोकेश राहुलच्या फॉर्मवरून हा वाद चिघळला आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतीय संघ व्यवस्थापनाने लोकेश राहुलवर विश्वास दाखवला. पण पहिल्या दोन कसोटीत तो त्या विश्वासावर खरा उतरू शकला नाही. व्यंकटेश प्रसाद राहुलच्या अपयशामुळे त्याच्या विरोधात आहेत. त्याचवेळी आकाश चोप्राने राहुलची पाठराखण केली आहे. दोघांमध्ये सुरू असलेल्या ट्विटर वॉरमध्ये आता हरभजन सिंगनेही उडी घेतली आहे.  

हरभजन सिंगने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, बाकी सगळे फक्त मजा करत आहेत. लोकेश राहुलने कोणताही गुन्हा केलेला नाही, ज्यासाठी त्याच्याबद्दल अनेक गोष्टी सांगायला हव्यात. खिल्ली उडवण्यापेक्षा त्याला थोडा वेळ देणे चांगले.

केएल राहुलवरून चोप्रा-प्रसाद यांच्यात वाद 
खरं तर व्यंकटेश प्रसाद आणि आकाश चोप्रा ट्विटरवर लोकेश राहुलवरून आमनेसामने आहेत. लोकेश राहुलवर टीका करण्यामागे व्यंकटेश अय्यरची स्वतःची कारणे आहेत. त्याचवेळी आकाश चोप्राही तितक्याच तत्परतेने आपली बाजू मांडताना पाहायला मिळाला. आकाश चोप्राने तर व्यंकटेश प्रसादला त्याच्या यूट्यूब चॅनेलवर लोकेश राहुलवरील वादावर बोलण्यासाठी बोलावले होते. पण प्रसादने त्याची ऑफर नाकारली. या प्रकरणात त्याच्याशी बोलायला आवडणार नाही, असेही प्रसादने सांगितले.

राहुलची खिल्ली उडवू नका - हरभजन सिंग 
लोकेश राहुलवरून प्रसाद आणि आकाश यांच्या अशा वक्तव्यामुळे प्रकरण पेटले असताना हरभजन सिंगनेही त्यात उडी घेतली आहे. तो त्याच्या यूट्यूब चॅनेलवर म्हणाला, "लोकेश राहुलला थोडा आणखी वेळ द्यावा लागेल. प्रत्येक खेळाडू त्याच्या फॉर्मपासून दूर जातो तेव्हा असेच घडते. बड्या क्रिकेटपटूंसोबत देखील असे घडले आहे. राहुलचा फॉर्मही कालांतराने परत येईल." 

गौतम गंभीरने केली पाठराखण 

"लोकेश राहुलला भारतीय संघातून वगळता कामा नये. कोणत्याही खेळाडूला बाहेर काढता कामा नये. प्रत्येकजण खराब फॉर्मचा सामना करत असतो. त्याला कोणीही सांगू नये की तो चांगली कामगिरी करत नाही. आपल्याला प्रतिभा असलेल्या खेळाडूंच्या पाठीशी उभे राहावे लागेल", असे गौतम गंभीरने पीटीआय या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. 

तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ -  रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जयदेव उनाडकट.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

Web Title: Don't make fun of KL Rahul, Harbhajan Singh reacts to Venkatesh Prasad and Akash Chopra controversy  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.