अन्न हे पूर्णब्रम्ह! BCCI चा नियम मोडून विराट कोहलीने राखला अन्नाचा मान, केरळच्या शेफने सांगितला किस्सा

IPL 2023 Virat Kohli - भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली हा क्रिकेटर म्हणून ग्रेट आहेच, परंतु एक माणूस म्हणूनही त्याने अनेकदा समाजकार्य केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 05:02 PM2023-04-10T17:02:23+5:302023-04-10T17:02:51+5:30

whatsapp join usJoin us
‘Don’t waste food, Kohli asks to serve rest of Sadya night’; A beautiful story between Virat Kohli & famous Kerala chef Pillai in 2018 | अन्न हे पूर्णब्रम्ह! BCCI चा नियम मोडून विराट कोहलीने राखला अन्नाचा मान, केरळच्या शेफने सांगितला किस्सा

अन्न हे पूर्णब्रम्ह! BCCI चा नियम मोडून विराट कोहलीने राखला अन्नाचा मान, केरळच्या शेफने सांगितला किस्सा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023 Virat Kohli - भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली हा क्रिकेटर म्हणून ग्रेट आहेच, परंतु एक माणूस म्हणूनही त्याने अनेकदा समाजकार्य केले आहे. कोची येथील शेफ सुरेश पिल्लई यांनी भारताचा माजी कर्णधार विराटसोबतच्या त्यांच्या आठवणी शेअर केल्या. शेफ पिल्लईने विराट कोहलीला जेवण सर्व्ह करण्याचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. २०१८ मध्ये भारत-वेस्ट इंडिज मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघ तिरुअनंतपुरमला आला तेव्हा सुरेश पिल्लई यांनीच खेळाडूंसाठी जेवण तयार केले होते. विराट हा शाकाहारी असल्यामुळे त्याच्यासाठी २४ वेगवेगळ्या पदार्थांची खास डिश तयार केली गेली होती आणि अन्य खेळाडूंनी मास्यांवर ताव मारला होता.  

तुषार देशपांडेने खरंच MI कर्णधार रोहित शर्माचा अपमान केला? CSK गोलंदाजाची इस्टा स्टोरी व्हायरल

“आम्ही भारतीय खेळाडूंसाठी समुद्र आणि अष्टमुडी तलावातील मासे वापरून अन्न तयार केले. कोहली शाकाहारी आहे आणि त्यावेळी मी त्याला मेजवानी देतो असे सांगितले होते. कोहलीसाठी २४ पदार्थांची मेजवानी तयार करण्यात आली होती. ते इतके सोपे नव्हते. पण आम्ही ते कोहलीसाठी केले,''असे पिल्लई म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले,''जेवणानंतर जे घडले ते मला खरोखर आश्चर्यचकित करणारे होते. उरलेल्या अन्नाचे काय करता, असा सवाल कोहलीने केला. ते फेकून देतो असे मी त्याला दुःखाने म्हटले. पाहुण्यांचे जेवण ठेवू नये असा हॉटेलचा नियम आहे. पण, कोहलीने उरलेलं जेवण रात्री त्याला खायला देण्यास सांगितले.'' 


''आम्ही वारंवार नकार देऊनही कोहलीने अन्न वाया जाऊ नये यासाठी आम्हाला विनंती केली. त्याचा विनंतीचा मान राखून आम्ही तेच जेवण त्याला रात्री दिले. आयुष्यात एवढा यशस्वी झालेला माणूस उरलेले पदार्थ पुन्हा द्यायला सांगतो. पैशाने जे मिळेल ते तो विकत घेऊ शकतो. पण, त्याला त्याचा गर्व नाही. अन्नाची नासाडी त्याला पटत नाही,” अशी पोस्ट पिल्लई यांनी लिहीली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: ‘Don’t waste food, Kohli asks to serve rest of Sadya night’; A beautiful story between Virat Kohli & famous Kerala chef Pillai in 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.