Join us  

भारताच्या या खेळाडूला वनडे आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटचे दरवाजे बंद; विराट कोहलीने केला खुलासा

भारताच्या या खेळाडूला वनडे आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये स्थान मिळू शकणार की नाही. याबाबत कोहलीने खुलासा केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 6:44 PM

Open in App

मुंबई : जर एखादा खेळाडू फक्त कसोटी संघात खेळत असेल आणि त्याच्याकडून चांगली कामगिरी होत असेल तर त्याला वनडे आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये संधी देण्यात येते. पण एका खेळाडूच्या बाबतीत मात्र भारताचा कर्णधार विराट कोहलीने ही गोष्ट नाकारली आहे. भारताच्या या खेळाडूला वनडे आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये स्थान मिळू शकणार की नाही. याबाबत कोहलीने खुलासा केला आहे.

भारताचा सलामीवीर मयांक अगरवाल हा कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करतो आहे. त्यामुळे त्याला वनडे आणि ट्वेन्टी-२० संघा स्थान मिळू शकते, अशी चर्चा काही दिवसांपूर्वी चांगलीच रंगली होती. त्याच धर्तीवर अन्य खेळाडूंनाही संधी मिळायला हवी. पण तसे मात्र होताना दिसत नाही.

भारताचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहा याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत संघाबाहेर बसवले होते. पण त्यानंतर रिषभ पंत हा सातत्याने अपयशी ठरत असल्याने त्याला बांगलादेशवरुद्धच्या कसोटी मालिकेत स्थान दिले नाही आणि साहाला खेळवण्यात आले. साहाने आतापर्यंत चागंली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याला वनडे आणि ट्वेन्टी-२० संघा स्थान मिळू शकते का, अशी चर्चा सुरु होती. पण कोहलीने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

याबाबत कोहली म्हणाला की, " साहा एक चांगला यष्टीरक्षक आहे. त्याची कामगिरीही चांगली होत आहे. आयपीएलमध्येही त्याने दमदार कामगिरी केली आहे. पण आयपीएलमध्ये आठ यष्टीरक्षक असतात त्या सर्वांची कामगिरी पाहावी लागते. त्याचबरोबर भारताने वेगवेगळ्या क्रिकेटच्या प्रकारांसाठी संघही भिन्न बनवले आहेत. त्यामुळे सर्व प्रकारांतील कामगिरी ही दुसऱ्या प्रकारासाठी किती महत्वाची धरली गेली पाहिजे, हेदेखील पाहायला हवे." 

पहिल्या डे नाइट टेस्टबद्दल विराट कोहलीने केला मोठा खुलासा, सांगितले का रद्द करावा लागला सामनामुंबई : भारतामध्ये पहिल्या डे नाइट टेस्ट सामना उद्यापासून सुरु होणार आहे. या ऐतिहासिक सामन्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. पण पहिल्या पहिल्या डे नाइट टेस्टबद्दल भारताचा कर्णधार विराट कोहलीने मोठा खुलासा केला आहे. हा सामना रद्द का करावा लागला, याबद्दल कोहलीने आपले मत व्यक्त केले आहे.

भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये उद्यापासून पहिल्या डे नाइट टेस्ट मॅचला सुरुवात होणार आहे. भारतामध्ये पहिल्यांदाच डे नाइट टेस्ट मॅच खेळवण्यात येणार आहे. पण यापूर्वीही भारताची एक डे नाइट टेस्ट मॅच होणार होती. पण या मॅचचे नेमके काय झाले, याबाबत कोहलीने आपले मत व्यक्त केले आहे.

भारताचा संघ गेल्यावेळी जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. तेव्हा भारताचा संघ कसोटी मालिकाही खेळणार होता. या कसोटी मालिकेत भारताने एक सामना डे नाइट खेळावा, अशी ऑस्ट्रेलियाने विनंती केली होती. पण भारताने ही विनंती मान्य केली नाही. भारताने डे नाइट टेस्ट खेळायला तेव्हा का नकार दिला, याबाबत कोहलीने स्पष्टीकरण दिले आहे.

या बाबत कोहली म्हणाला की, " डे नाइट कसोटी खेळणे सोपे नसते. या सामन्यांमध्ये गुलाबी चेंडू वापरला जातो. या चेंडूचा तुम्हाला चांगला सराव असेल तरच तुम्ही डे नाइट टेस्ट खेळू शकता. ही गोष्ट पटकन स्वीकारण्यासारखी नक्कीच नाही. जर ही गोष्ट फार पूर्वी ठरली असती तर आम्ही विनंती स्वीकारून डे नाइट टेस्ट मॅच खेळलो असतो. पण ऐनवेळी या गोष्टी ठरवून होणार नाही." 

टॅग्स :विराट कोहलीवृद्धिमान साहा