Join us  

उघडले जाणार स्टेडियमचे दरवाजे; आयपीएल सामन्यांत ५० टक्के प्रवेशास परवानगी

रविवारी पहिला सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये गत चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात होईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 8:57 AM

Open in App

नवी दिल्ली : आयपीएल-१४चा दुसरा टप्पा रविवारपासून यूएईत सुरू होत आहे. या टी-२० लीगदरम्यान प्रेक्षकांना मर्यादित संख्येत मैदानात प्रवेश देण्याची घोषणा बीसीसीआयने केली आहे. आयपीएलचे आयोजन मे महिन्यात बायोबबलमध्ये खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळताच स्थगित करण्यात आले होते. 

रविवारी पहिला सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये गत चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात होईल. आयपीएलने दिलेल्या माहितीनुसार, ‘पहिला सामना अविस्मरणीय क्षण असेल. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे काही महिन्यांनंतर स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीचे आम्ही स्वागत करणार आहोत.’ सर्व सामने दुबई, शारजा आणि अबुधाबी येथे होणार असून कोरोना प्रोटोकॉल तसेच यूएई सरकारचे दिशानिर्देश पाळून प्रेक्षकांसाठी मर्यादित आसनांची व्यवस्था करण्यात येणार आहे. २०१९नंतर प्रथमच आयपीएलचे आयोजन प्रेक्षकांच्या साक्षीने होईल.

मागच्या सत्रात सर्व सामने यूएईतच प्रेक्षकाविना पार पडले. २०२१ चा पहिला टप्पाही बायोबबलमध्येच खेळविण्यात आला. अयाोजकांनी प्रेक्षक संख्येचा उल्लेख केलेला नाही. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही संख्या एकूण प्रेक्षक क्षमतेच्या ५० टक्के असेल. यासाठी प्रेक्षक आयपीएलच्या अधिकृत वेबसाइटवर तिकिटे बुक करू शकतील. १६ सप्टेंबरपासून तिकीट विक्री सुरू होत आहे. तिकीट प्लॅटिनमलिस्ट डॉट नेट या वेबसाइटवरही उपलब्ध आहे. 

टॅग्स :आयपीएल २०२१
Open in App