Join us  

Ranji Trophy 2022 : २९ चेंडूंत १२२ धावांचा पाऊस! अजिंक्य रहाणेचं खणखणीत द्विशतक अन् मुंबईच्या पाचशेपार धावा

Ranji Trophy 2022 : भारताच्या कसोटी संघातून बाहेर असलेल्या अजिंक्य रहाणेला ( Ajinkya Rahane) अखेर सूर गवसला...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 11:13 AM

Open in App

Ranji Trophy 2022 : भारताच्या कसोटी संघातून बाहेर असलेल्या अजिंक्य रहाणेला ( Ajinkya Rahane) अखेर सूर गवसला... मुंबईत सुरू असलेल्या रणजी करंडक स्पर्धेच्या हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या कर्णधाराने द्विशतक झळकावले. तीन वर्षांनंतर रणजी करंडक स्पर्धेत खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा फॉर्म कायम राखला, परंतु त्याचे शतक थोडक्यात हुकले. मात्र, यशस्वी जैस्वाल व कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी दम दाखवला. यशस्वी १६२ धावांवर बाद झाला, परंतु अजिंक्यने शतकाचे द्विशतकात रूपांतर करताना मुंबईला पाचशेपार नेले. 

पृथ्वी शॉ २१ चेंडूंत १९ धावांवर माघारी परतल्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि सूर्यकुमार यादव यांनी तुफान फटकेबाजी केली. सूर्याने यशस्वीसह १५३ धावांची भागीदारी केली. सूर्या ८० चेंडूंत ९० धावा करून माघारी परतला. त्याच्या या खेळीत १५ चौकार व १ षटकाराचा समावेश आहे. त्यानंतर यशस्वी व अजिंक्य यांनी तिसऱ्या विकेटसाठी २०६ धावा जोडल्या. यशस्वीने  १९५ चेंडूंत २७ चौकार व १ षटकार खेचत १६२ धावांची मोठी खेळी केली. शशांक एम याने त्यालाही बाद केले. 

अजिंक्यने १२१ चेंडूंत  शतक पूर्ण करताना १४ चौकार व  २ षटकार खेचले होते आणि हे त्याचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ३८वे शतक ठरले. आज अजिंक्यने द्विशतक पूर्ण केले. २५३ चेंडूंत २६ चौकार व ३ षटकारांसह पूर्ण केल्या २०० धावा. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील चौथे व या पर्वातील दुसरी डबल सेंच्युरी ठोकली. मुंबईने १११ षटकांत ५ बाद ५८४ धावा केल्या असून सर्फराज खान ९६ धावांवर खेळतोय. अजिंक्य २०४ धावांवर बाद झाला. 

अजिंक्य रहाणेची चार द्विशतकं २०१ वि. ओडिशा, २००८२६५* वि. हैदराबाद, २००९२०७* ( पश्चिम विभागासाठी) वि. उत्तर पूर्णविभाग, २०२२२०४ वि. हैदराबाद, २०२२  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :अजिंक्य रहाणेरणजी करंडकमुंबईहैदराबाद
Open in App