दक्षिण आफ्रिका क्रिकेटचे संचालक आणि माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ यानं ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या दुटप्पी वागणूकीवर निशाणा साधला. इंडियन प्रीमिअर लीगचे १४वे पर्व स्थगित झाल्यानंतर स्मिथनं ऑसी खेळाडूंचा समाचार घेतला. भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना काही खेळाडू गप्प बसले होते आणि याच खेळाडूंनी कोरोना व्हायरसचं कारण देताना दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यास नकार दिला होता. खेळाडूंचं असं दुटप्पी वागणं पाहून निराश झालो, असे स्मिथ म्हणाला. कोरोनाच्या शिरकावामुळे उडाली होती खळबळ, मायदेशात परतल्यानंतर मिळाला दिलासा - ख्रिस मॉरिस
''आयपीएलमधील काही खेळाडू गप्प बसले आहेत. हेच खेळाडू दक्षिण आफ्रिकेत कोरोना आहे, म्हणून दौऱ्यावर जाण्यास नकार देत होते. असा दुटप्पीपणा पाहून वाईट वाटते,''असे स्मिथ म्हणाला. स्मिथनं ११७ कसोटी व १९७ वन डे सामन्यांत दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले. त्यानं कसोटीत ९२६५ धावा व वन डेत ६९८९ धावा केल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू आयपीएलमध्ये सुरक्षित होते - स्मिथ
आयपीएलमध्ये सहभागी झालेला आमचा प्रत्येक खेळाडू बायो-बबलमध्ये सुरक्षित होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वतीने तयार करण्यात आलेल्या जैव सुरक्षा वातावरणात कोणताही खेळाडू स्वत:ला असुरक्षित अनुभवत नव्हता,’ असे स्मिथ म्हणाला. दिल्ली असुरक्षित, न्यूझीलंडच्या खेळाडूंनी बदलला प्लान; पोहोचले मालदिवला अन् कोणाला पत्ताच नाही!
यंदाच्या स्पर्धेत सहभागी झालेले दक्षिण आफ्रिकेचे सर्व ११ खेळाडू जोहान्सबर्गला पोहोचले आहेत. यानंतर स्मिथने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, ‘आम्हाला कशाही प्रकारे कोणता निर्णय द्यायचा नव्हता. खेळाडूंशी संपर्क साधल्यावर, ते तिथे सुरक्षित असल्याचे कळाले. त्यांचे म्हणणे होते की, भारतातील बायो-बबलचा अनुभव खूप चांगला ठरला. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना असुरक्षितता वाटत नव्हती. मात्र, ही स्थिती कोरोनाशी जुळलेली आहे.’
आयोजकांना दोषी धरता येणार नाहीयावेळी स्मिथने आयोजकांना दोषी धरता येणार नसल्याचेही सांगितले. स्मिथ म्हणाला की, ‘अनेकदा गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत. बायो-बबलला कधीच पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगता येणार नाही. जेव्हा आपल्या देशात कोरोनाचा प्रकोप होत असतो, तेव्हा धोका नेहमीच असतो. दुर्दैवाने जेव्हा हा विषाणू बायो-बबलमध्ये प्रवेश करतो, तेव्हा पुढे काय होणार हे सांगणे कठीण होऊन जाते.’