Join us  

Virat Kohli: भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी ऑस्ट्रेलियाच्या उपपंतप्रधानांना दिली 'विराट' भेट, फोटोनं वेधलं लक्ष

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्स यांची भेट घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 4:56 PM

Open in App

नवी दिल्ली : भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आपल्या दुसऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री आणि उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्स तसेच शिक्षण मंत्री जेसन क्लेअर यांची भेट घेतली. 10 ऑक्टोबर रोजी झालेल्या या भेटीत दोन्ही देशांतील शांततापूर्ण, समृद्ध आणि नियमांवर चर्चा झाली. तसेच भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी ऑस्ट्रेलियाच्या उपपंतप्रधानांना विराट कोहलीने स्वाक्षरी केलेली बॅट भेट म्हणून दिली. त्यामुळे एस जयशंकर यांच्या या भेटीची क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे. 

एस जयशंकर यांनी दिलेल्या या भेटवस्तूनंतर ऑस्ट्रेलियाचे उपप्रंतप्रधान रिचर्ड मार्ल्स यांनी ट्विटद्वारे म्हटले की, "@DrSJaishankar यांना कॅनबेरा येथे होस्ट करण्याचा आनंद आहे. क्रिकेटच्या प्रेमासह अनेक गोष्टी आपल्याला बांधून ठेवत असतात. आज त्यांनी क्रिकेटच्या दिग्गजांने स्वाक्षरी केलेली बॅट दिली. @imVkohli", विराट कोहलीला मेन्शन करून ऑस्ट्रेलियाच्या उपपंतप्रधानांनी याबाबतची अधिकृत माहिती दिली. 

एस जयशंकर यांनी शेअर केला भेटीचा फोटो सामरिक इंडो-पॅसिफिक प्रदेशात चीनच्या वाढत्या लष्करी प्रभावादरम्यान जयशंकर म्हणाले, "ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री रिचर्ड मार्ल्स यांना भेटून आनंद झाला. प्रादेशिक आणि जागतिक सुरक्षेवर विचार विनिमय केला. आमचे वाढते संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य शांततापूर्ण, समृद्ध आणि नियमांवर आधारित इंडो-पॅसिफिकची खात्री देते," परराष्ट्र मंत्री काही भेटवस्तू देत असल्याचा फोटो त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. 

विराट कोहलीच्या खेळीकडे लक्ष विराट कोहलीने आशिया चषकाच्या स्पर्धेतून आपली जुनी लय पकडली आहे. त्यामुळे आगामी टी-20 विश्वचषकात त्याची विराट झलक पाहायला मिळणार का हे पाहण्याजोगे असेल. विराटने आशिया चषकात अफगाणिस्तानविरूद्ध शतक झळकावले होते. किंग कोहलीने जवळपास 3 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक ठोकले होते. विश्वचषकात भारतीय संघाचा पहिला सामना आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्ध 3 ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये होणार आहे. अशा स्थितीत मागील विश्वचषकात पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. भारतीय संघाचा सध्याच्या संघातील सर्वात यशस्वी फलंदाज विराट कोहली आगामी विश्वचषकात कशी खेळी करतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.  

टॅग्स :विराट कोहलीभारतआॅस्ट्रेलिया
Open in App