Join us  

या क्रिकेटपटूसाठी जीव द्यायलापण तयार : सुरेश रैना

मी तर उत्तर प्रदेशच्या गावातून आलो होतो. कसं खायचं, कटलरी कशी वापरायची यांसारख्या कोणत्याच गोष्टी मला माहित नव्हत्या केवळ बॉल कसा मारायचा एवढंच मला माहित होतं. 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 12:27 PM

Open in App

दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिकेद्वारे भारतीय संघात पुनरागमन करणारा स्टार फलंदाज सुरेश रैनाने माजी कर्णधार राहुल द्रविडच्या योगदानाचं तोंडभरून कौतूक केलं आहे. द्रविडने मला कसं जगावं हे शिकवलं, द्रविड माझ्या मोठ्या भावाप्रमाणे आहे. जर द्रविडप्रमाणे प्रेरणा देणारा एखादा व्यक्ती असेल तर त्याच्यासाठी जीव देखील देऊ शकतो असं सुरेश रैना म्हणाला. राहुल द्रविडच्याच कर्णधारपदाखाली रैनाने टीम इंडियामध्ये पदार्पण केलं होतं. 

टाइम्स ऑफ इंडियाला दिले्या मुलाखतील रैना म्हणाला, मी नेहमी द्रविडची पूजा केली आहे. द्रविड माझा पहिला कर्णधार होता आणि नेहमी माझ्या मोठ्या भावाप्रमाणे द्रविड राहिला. मी तर उत्तर प्रदेशच्या गावातून आलो होतो. कसं खायचं, कटलरी कशी वापरायची यांसारख्या कोणत्याच गोष्टी मला माहित नव्हत्या केवळ बॉल कसा मारायचा एवढंच मला माहित होतं. द्रविडची भेट झाल्यानंतर जीवन कसं जगावं, एखाद्या खेळाडूची वागणूक कशी असावी हे सर्व द्रविडने शिकवलं. नवख्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याबाबत बोलताना रैना म्हणाला, जर कोणी राहुल द्रविड सारखा प्रेरणा देणारा व्यक्ती असेल तर त्याच्यासाठी मी माझा जीव देखील देईन.

दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिकेत ब-याच कालावधीनंतर रैनाने भारतीय संघात पुनरागमन केलं. 1 फेब्रुवारी 2017 रोजी इंग्लंडविरोधात त्याने शेवटचा टी-20 सामना खेळला होता.    

टॅग्स :सुरेश रैनाक्रिकेटराहूल द्रविड