"Dream 11सोबत सौदा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'आत्मनिर्भर भारत' मोहिमेला मोठा धक्का!"

संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे होणाऱ्या आयपीएलच्या 13व्या मोसमाची टायटल स्पॉन्सरशिप Dream 11ने मिळवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 04:31 PM2020-08-19T16:31:22+5:302020-08-19T16:32:04+5:30

whatsapp join usJoin us
Dream11 as IPL title sponsor will shatter PM Modi's 'Atma Nirbhar Bharat' dream: CAB secretary Aditya Verma | "Dream 11सोबत सौदा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'आत्मनिर्भर भारत' मोहिमेला मोठा धक्का!"

"Dream 11सोबत सौदा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'आत्मनिर्भर भारत' मोहिमेला मोठा धक्का!"

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगला (आयपीएल) अखेर टायटल स्पॉन्सर सापडला. संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे होणाऱ्या आयपीएलच्या 13व्या मोसमाची टायटल स्पॉन्सरशिप Dream 11ने मिळवले. भारत-चीन सीमेवरील वाढत्या तणावानंतर चिनी वस्तुंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरत होती. त्यामुळे Vivoनं आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशिपवरून माघार घेतली. आता ड्रीम 11नं 222 कोटींत हे स्पॉन्सरशिप नावावर केली. आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी ही माहिती दिली. पण, आता ड्रीम 11सोबतचा सौदाही वादात अडकण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. 

ड्रीम 11शी सौदा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'आत्मनिर्भर भारत' मोहिमेला मोठा धक्का असल्याचं मत बिहार क्रिकेट असोसिएशनचे सचिव आदित्य वर्मा यांनी व्यक्त केलं. भारत-चीन सीमेवरील वाढत्या तणावानंतर चिनी वस्तुंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरत होती. त्यामुळे Vivoनं माघार घेतली. Vivo India ने 2018मध्ये 2199 कोटींत आयपीएलचे टायटल स्पॉन्सर हक्क मिळवले होते. त्यानुसार आयपीएलला एका वर्षाला Vivoकडून 440 कोटी मिळतात. Vivoची तीन वर्षांचा करार अजूनही शिल्लक आहे. त्यानुसार 2021, 2022 आणि 2023ला Vivo पुन्हा आयपीएलचे टायटल स्पॉन्सर म्हणून परतणार आहेत.

ड्रीम 11नं 222 कोटींत हे स्पॉन्सरशीप नावावर केली असून अनअकॅडमीनं 210, टाटा सन्सनं 180 आणि बायजूनं 125 कोटींची बोली लावली होती. पण ड्रीम 11सोबतची ही डील 'आत्मनिर्भर भारत' मोहिमेला तडा देणारी आहे. वर्मा म्हणाले,''भारतीय क्रिकेटचा हितचिंतक म्हणून यूएईत आयपीएल यशस्वी होऊदे, ही माझी इच्छा आहे. पण, ड्रीम 11 आयपीएल टायटल स्पॉन्सर बनल्यानं पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर मोहिमेला धक्काच आहे. ड्रीम 11ही चायनीज कंपनी आहे. आयपीएलमधील एका फ्रँचायझीची यात गुंतवणूक आहे.'' 

खरंच ड्रीम 11 चिनी कंपनी आहे का?

  • ड्रीम 11 ही चायनीस कंपनी आहे का? याचं उत्तर नाही असं आहे. ड्रीम 11वा टर्न ओव्हर 736 कोटींचा आहे. मुंबईतील हर्ष जैन व भावीत सेठ यांनी 2012मध्ये ही कंपनी सुरू केली. 2019मध्ये ही कंपनी भारतातील पहिली गेमींग कंपनी बनली.
  • पण, ड्रीम 11चं चायनीज कनेक्शन आहे. त्यांच्या कंपनीत Steadview, Kalaari Capital, Think Investments, Multiples Equity आणि Tencent आदी कंपनींचीही गुंतवणूक आहे. Tencent ही चायनीज कंपनी आहे. जगातील सर्वात मोठी गेमिंग कंपनी म्हणून Tencentची ओळख आहे आणि त्यांची ड्रीम 11मध्ये 10 टक्के भागीदारी आहे.
  • महेंद्रसिंग धोनी हा या कंपनीचा ब्रँड अँम्बेसिडर आहे. त्याच्यासह जोस बटलर, बेन स्टोक्स, जॉनी बेअरस्टो, फॅफ ड्यू प्लेसिस, क्विंटन डी कॉक, कागिसो रबाडा, आंद्रे रसेल, जेसन होल्डर आणि केन विलियम्सन यांच्यासोबत वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत करार केला होता.
  • कॅरेबियन प्रीमिअर लीग, इंडियन सुपर लीग, नॅशनल बास्केटबॉल लीग, प्रो कबड्डी लीग यासह आयसीसी, बीबीएल, डब्लूबीबीएल आणि आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचेही ते प्रायोजक आहेत.

 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

रांचीमधील मंदिर अन् धोनी...असं आहे श्रद्धेचं नातं; जाणून घ्या सर्वकाही 

महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, BCCI आयोजित करणार निरोपाचा सामना; कधी व केव्हा? 

CPL 2020 : महेंद्रसिंग धोनीचा 'हॅलिकॉप्टर' शॉट मिस करताय; मग रशीद खानचा 'हा' फटका पाहाच

Web Title: Dream11 as IPL title sponsor will shatter PM Modi's 'Atma Nirbhar Bharat' dream: CAB secretary Aditya Verma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.