नवी दिल्ली : बीसीसीआयनेआयपीएलच्या १४ व्या पर्वासाठी टायटल प्रायोजकाचा शोध सुरू केला आहे. वृत्तानुसार विवोने पुन्हा जुळण्यास नकार दिला. चीनच्या उत्पादनावर बहिष्काराच्या भूमिकेमुळे मागच्या पर्वात विवोने माघार घेतली होती. त्यानंतर ड्रीम इलेव्हनने टायटल प्रायोजक बनण्याची तयारी दर्शविली होती. विवोचा आयपीएलसोबतचा करार २०२२ पर्यंत होता. भारत-चीनमधील राजकीय संबंध विकोपाला गेल्यामुळे विवोला माघार घ्यावी लागली.विवोने आता नकार कळविताच बीसीसीआयला पुन्हा एकदा प्रायोजकाचा शोध घ्यावा लागत आहे. यासाठी प्रक्रिया राबवावी लागेल. विवो अन्य तिसऱ्याच उत्पादकाला प्रायोजक बनण्यास परवानगी देईल, अशी शक्यतादेखील नाकारता येत नाही. विवोकडून मिळणाऱ्या रकमेइतकी रक्कम नवा प्रायोजक देईल का, याविषयी मात्र शंका आहे.बीसीसीआयच्या मागच्या लिलावात ड्रीम इलेव्हनने २२० कोटी रुपयांची बोली लावत बाजी मारली होती. ही रक्कम विवोच्या तुलनेत अर्धी होती. मात्र कोरोनाची स्थिती पाहता बीसीसीआयने योग्य निर्णय घेतला. ड्रीम इलेव्हनने बीसीसीआयला २०२१ आणि २०२२ च्या आयोजनासाठी क्रमश: २४० आणि २५० कोटी रुपये देण्याची ऑफर दिली होती. बोर्डाने मात्र ती फेटाळून लावली.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- बीसीसीआय पुन्हा शोधणार ‘टायटल प्रायोजक’
बीसीसीआय पुन्हा शोधणार ‘टायटल प्रायोजक’
चीनच्या उत्पादनावर बहिष्काराच्या भूमिकेमुळे मागच्या पर्वात विवोने माघार घेतली होती. त्यानंतर ड्रीम इलेव्हनने टायटल प्रायोजक बनण्याची तयारी दर्शविली होती.
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 4:23 AM