नवी दिल्ली : आशिया चषकाचा थरार संपला असून सर्वच संघ टी-20 विश्वचषकाच्या तयारीला लागले आहेत. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) देखील सोमवारी भारतीय संघाची घोषणा केली आहे. आयपीएलच्या (IPL) मागील हंगामात आरसीबीकडून (RCB) खेळणाऱ्या दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) टी-20 विश्वचषकाच्या संघात स्थान मिळाले आहे. अनेक दिग्गजांनी कार्तिकचे करिअर संपुष्टात आले असल्याचे म्हटले होते, मात्र कार्तिकने जिद्दीच्या बळावर सर्वांना खोटे ठरवत जोरदार कमबॅक केला. दिनेश कार्तिकने पाहिलेले स्वप्न आज पूर्ण झाले आहे. कार्तिकने आयपीएल 2022 मध्येच सांगितले होते की भारतीय संघासाठी विश्वचषक खेळण्याचे त्याचे स्वप्न आहे.
दरम्यान, आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे आणि त्यामध्ये दिनेश कार्तिकला स्थान मिळाले आहे. संघात निवड झाल्यानंतर कार्तिकने दिलेली प्रतिक्रिया सर्वांचे लक्ष वेधत आहे. दिनेश कार्तिकने ट्विटच्या माध्यमातू म्हटले, "स्वप्न खरी होतात", यासोबत त्याने हर्टची इमोजी देखील लावली आहे. कार्तिकला आयपीएल 2022 पासून आजपर्यंतचा प्रवास खूप खास राहिला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने दिनेश कार्तिकला खरेदी केले आणि या खेळाडूने फिनिशरच्या भूमिकेत चमकदार कामगिरी केली. त्यानंतर त्याने भारतीय संघात देखील जागा मिळवली. दिनेश कार्तिकने 2004 मध्ये त्याच्या करिअरला सुरुवात केली. 2007 च्या टी-20 विश्वचषकानंतर त्याला एकही टी-20 विश्वचषक खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ रोहित शर्मा (कर्णधार), के.एल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अक्षर पटेल,अर्शदीप सिंग.
भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रक23 ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न27 ऑक्टोबर - भारत वि. A गटातील उपविजेता, 12.30 वाजल्यापासून, सिडनी30 ऑक्टोबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, 4.30 वाजल्यापासून, पर्थ2 नोव्हेंबर - भारत. वि. बांगलादेश, 1.30 वाजल्यापासून, एडलेड6 नोव्हेंबर - भारत वि. B गटातील विजेता, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न13 नोव्हेंबरला अंतिम सामना