आयपीएलमध्ये पहिल्यांदाच वापरणार हा नियम, बीसीसीआयनं केला होता विरोध

आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच होणार वापर...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2018 05:33 PM2018-02-28T17:33:29+5:302018-02-28T17:33:29+5:30

whatsapp join usJoin us
drs-will-be-used-in-ipl-2018-as-bcci-gives-nod-to-the-system? | आयपीएलमध्ये पहिल्यांदाच वापरणार हा नियम, बीसीसीआयनं केला होता विरोध

आयपीएलमध्ये पहिल्यांदाच वापरणार हा नियम, बीसीसीआयनं केला होता विरोध

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली - आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच डीआरएस पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. कधीकाळी याचा बीसीसीआयनं विरोध दर्शवला होता. पण काळ बदलला आणि बीसीसीआयनं आयपीएलमध्ये DRS सिस्टमचा वापर करण्याला परवानगी दिली आहे. BCCI सुरुवातीला या प्रणालीबाबत सकारात्मक नव्हते. मात्र बीसीसीआयने या प्रणालीचा आयपीएलमध्ये प्रयोग करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. एका मुलाखतीत बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बीसीसीआयनं 2016 च्या शेवटी इंग्लंडच्या भारत दौऱ्यावेळी बीसीसीआयनं डीआरएसच्या वापरला परवानगी दिली होती. 

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की,  गेल्या काही दिवसांपासून आयपीएलमध्ये डीआरएस पद्धत लागू करण्याचा बीसीसीआय विचार करत होते. यावर्षी त्यांनी अखेर मंजूरी दिली. आपल्या जवळ इतर सर्व प्रणालीसाठी चांगले तंत्रज्ञान आहे तर मग डीआरएस प्रणालीचा वापर का नको? भारतीय संघ आंतरराष्ट्रीय सामन्यात मागील दोन वर्षापासून वापर करत करत आहे. 

डिसेंबर 2017 मध्ये बोर्डानं भारताच्या दहा अव्वल पंचाना विशाखापट्टनम मधघ्ये डीआरएसचे प्रशिषण दिलं आहे. त्यावेळी त्यांच्या डोक्यात आयपीएलमध्येही डीआरएस पद्धतीचा वापर करावा अशी आयडीया आली. 
 

पाहा स्पर्धेतील सामन्यांचे सविस्तर वेळापत्रक  

1) मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्ज - 7 एप्रिल, मुंबई

2) दिल्ली डेअसडेव्हिलस वि. किंग्ज इलेव्हन पंजाब - 8 एप्रिल, दिल्ली 

3) कोलकाता नाईटरायडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - 8 एप्रिल - कोलकाता

4) सनरायझर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स - 9 एप्रिल, हैदराबाद 

5) चेन्नई सुपरकिंग्ज वि. कोलकाता नाईटरायडर्स - 10 एप्रिल, चेन्नई 

6) राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली डेअरडेव्हिलस - 11 एप्रिल, जयपूर

7) सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स - 12 एप्रिल, हैदराबाद

8) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. किंग्ज इलेव्हन पंजाब - 13 एप्रिल, बंगळुरू 

9) मुंबई इंडियन्स वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स - 14 एप्रिल, मुंबई 

10) कोलकाता नाईटरायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद - 14 एप्रिल, कोलकाता

11) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. राजस्थान रॉयल्स - 15 एप्रिल, बंगळुरू 

12) किंग्ज इलेव्हन पंजाब वि. चेन्नई सुपरकिंग्ज - 15 एप्रिल, इंदूर 

13) कोलकाता नाईटरायडर्स वि. दिल्ली डेअरडेव्हिल- 16 एप्रिल, कोलकाता 

14) मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर बंगळुरू - 17 एप्रिल, मुंबई 

15) राजस्थान रॉयल्स वि. कोलकाता नाईटरायडर्स - 18 एप्रिल, जयपूर

16) किंग्ज इलेव्हन पंजाब वि. सनरायझर्स हैदराबाद- 19 एप्रिल, इंदूर 

17) चेन्नई सुपरकिंग्ज वि. राजस्थान रॉयल्स - 20 एप्रिल, चेन्नई 

18) कोलकाता नाईटरायडर्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाब -21 एप्रिल, कोलकाता

19) दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - 21 एप्रिल, दिल्ली 

20) सनरायझर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपरकिंग्ज - 22 एप्रिल, हैदराबाद 

21) राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स - 22 एप्रिल, जयपूर

22) किंग्ज इलेव्हन पंजाब वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स - 23 एप्रिल, इंदूर 

23 मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद - 24 एप्रिल, मुंबई 

24) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. चेन्नई सुपरकिंग्ज - 25 एप्रिल, बंगळुरू 

25) सनरायझर्स हैदराबाद वि. किंग्ज इलेव्हन पंजाब - 26 एप्रिल, हैदराबाद 

26) दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. कोलकाता नाईटरायडर्स - 27 एप्रिल, दिल्ली 

27) चेन्नई सुपरकिंग्ज वि. मुंबई इंडियन्स - 28 एप्रिल. चेन्नई
 
28) राजस्थान रॉयल्स वि. सनरायझर्स हैदराबाद - 29 एप्रिल, जयपूर 

29) रॉयल चॅलेंजर बंगळुरू वि. कोलकाता नाइटरायडर्स - 29 एप्रिल, बंगळुरू 

30) चेन्नई सुपरकिंग्ज वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स - 30 एप्रिल, चेन्नई

31) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स - 1 मे, बंगळुरू 

32) दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. राजस्थान रॉयल्स - 2 मे, दिल्ली 

33) कोलकाता नाईटरायडर्स वि. चेन्नई सुपरकिंग्ज - 3 मे, कोलकाता 

34) किंग्ज इलेव्हन पंजाब वि. मुंबई इंडियन्स - 4 मे, मोहाली

35) चेन्नई सुपरकिंग्ज वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - 5 मे, चेन्नई 

36) सनरायझर्स हैदराबाद वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स - 5 मे, हैदराबाद

37) मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईटरायडर्स - 6 मे, मुंबई 

38) किंग्ज इलेव्हन पंजाब वि. राजस्थान रॉयल्स - 6 मे, मोहाली

39) सनरायझर्स हैदराबाद वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - 7 मे, हैदराबाद

40) राजस्थान रॉयल्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाब - 8 मे, जयपूर 

41) कोलकाता नाईटरायडर्स वि. मुंबई इंडियन्स - 9 मे, कोलकाता

42) दिल्ली डेअरडेव्हिस वि. सनरायझर्स हैदराबाद - 10 मे, दिल्ली

43) राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपरकिंग्ज - 11 मे, जयपूर 

44) किंग्ज इलेव्हन पंजाब वि. कोलकाता नाइटरायडर्स - 12 मे, मोहाली

45) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स - 12 मे, बंगळुरू 

46) चेन्नई सुपरकिंग्ज वि. सनरायझर्स हैदराबाद - 13 मे, चेन्नई 

47) मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स - 13 मे, मुंबई 

48) किंग्ज इलेव्हन पंजाब वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू  - 14 मे, मोहाली

49) कोलकाता नाईटरायडर्स वि. राजस्थान रॉयल्स - 15 मे, कोलकाता 

50) मुंबई इंडियन्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाब - 16 मे, मुंबई 

51) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. सनरायझर्स हैदराबाद - 17 मे, बंगळुरू 

52) दिल्ली डेअरडेव्हिस वि. चेन्नई सुपरकिंग्ज - 18 मे, दिल्ली 

53) राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - 19 मे, जयपूर 

54) सनरायझर्स हैदराबाद वि. कोलकाता नाइटरायडर्स - 19, हैदराबाद

55) दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. मुंबई इंडियन्स - 20 मे, दिल्ली 

56) चेन्नई सुपरकिंग्ज वि. किंग्ज इलेव्हन पंजाब - 20 मे, चेन्नई
 

क्वालिफायर/ एलिमिनेटर फेरी

57) क्वालिफायर 1 -  22 मे, मुंबई 

58) एलिमिनेटर - 23 मे

59) क्वालिफायर 2 -  24 मे 

60 अंतिम लढत -  27 मे, मुंबई 

Web Title: drs-will-be-used-in-ipl-2018-as-bcci-gives-nod-to-the-system?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.