IPL 2024च्या तयारीला सुरूवात; ऑक्शनसाठीचा देश अन् तारीख ठरली, ट्रेडिंग विंडो खुली झाली

वन डे वर्ल्ड कप स्पर्धा सुरू असताना क्रिकेट चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 02:51 PM2023-10-26T14:51:06+5:302023-10-26T14:51:51+5:30

whatsapp join usJoin us
Dubai likely to host IPL 2024 auction between 15th to 19th December, The trading window is currently open | IPL 2024च्या तयारीला सुरूवात; ऑक्शनसाठीचा देश अन् तारीख ठरली, ट्रेडिंग विंडो खुली झाली

Dubai likely to host IPL 2024 auction between 15th to 19th December

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

वन डे वर्ल्ड कप स्पर्धा सुरू असताना क्रिकेट चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. इंडियन प्रीमियर लीग ( IPL 2024) साठी लिलाव दुबईमध्ये होण्याची शक्यता आहे आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) १५ ते १९ डिसेंबर दरम्यानच्या तारखा नियोजित केल्या आहेत. महिला प्रीमियर लीग (WPL) साठी लिलाव ९ डिसेंबर रोजी होणे अपेक्षित आहे. WPL लिलावाचे ठिकाण निश्चित झालेले नसले तरी, ते भारतात होण्याची शक्यता आहे. 


फ्रँचायझींना कोणतीही औपचारिक सूचना पाठवण्यात आली नसली तरी, आयपीएल लिलाव दुबईमध्ये होणार असल्याच्या चर्चेने खळबळ उडाली आहे. बीसीसीआयने गेल्या वर्षीचा लिलाव इस्तांबूलमध्ये आयोजित करण्याचा विचार केला होता, परंतु अखेरीस कोची येथे लिवाव घेतला गेला. गेल्या वर्षाचे उदाहरणे पाहता दुबईची योजना तात्पुरती असू शकते, परंतु सर्व आयपीएल फ्रँचायझींना लिलावाचे ठिकाण म्हणून गल्फ सिटीचा विचार करण्यात आला असल्याचे सांगितले गेले आहे. 

Image
ट्रेडिंग विंडो सध्या खुली झाली आहे, परंतु आतापर्यंत आयपीएल फ्रँचायझींमध्ये खेळाडूंच्या देवाणघेवाणीचे कोणतेही अहवाल समोर आलेले नाहीत. खेळाडूंना तीन वर्षांसाठी करारबद्ध केल्यानंतर या ट्रेडिंग विंडोत मोठी नावं दिसतील हे अनिश्चित आहे, परंतु गेल्या आयपीएल हंगामात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या काही भरघोस पगार घेणाऱ्या खेळाडूंना रिलीज केले जाऊ शकते.  


दरम्यान, बीसीसीआयने अद्याप मालकांना महिला प्रीमियर लीग (WPL) लिलावाचे ठिकाण आणि तारखा कळवलेल्या नाहीत. अशी शक्यता वर्तवली जात आहे की लीग यावर्षी फेब्रुवारीमध्ये आयोजित केली जाऊ शकते. Cricbuzz ने पूर्वी दिलेल्या वृत्तानुसार भारतीय महिला संघ जानेवारीच्या मध्यापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यात व्यग्र राहणार आहेत. 


डब्ल्यूपीएल एकाच शहरात आयोजित केले जाईल की नाही याबद्दल संघांना पुष्टी मिळालेली नाही, मागील वर्षी प्रमाणेच संपूर्ण लीग मुंबईत आयोजित केली गेली होती किंवा यावेळी ती वेगवेगळ्या ठिकाणी खेळवली जाईल, हेही अद्याप ठरलेले नाही. 

Web Title: Dubai likely to host IPL 2024 auction between 15th to 19th December, The trading window is currently open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.