कोलंबो - निदाहास चषक तिरंगी ट्वेन्टी-20 सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध मैदानात उतरेल, तो पहिल्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्यासाठीच. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला श्रीलंकेकडून पराभूत व्हावे लागले होते. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने बांगलादेशवर विजय मिळवला होता. पण शनिवारी मात्र श्रीलंकेला बांगलादेशविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता.
भारताची या स्पर्धेतील कामिगरी सुधारत असताना दिसत आहे. या दोन्ही सामन्यांमध्ये सलामीवीर शिखर धवनने अर्धशतक झळकाले होतो. तो सध्या भन्नाट फॉर्मात आहे. त्याने कामगिरीत सातत्य राखणे, भारतासाठी महत्वाचे असेल. कर्णधार रोहित शर्मा आणि सुरेश रैना यांना मात्र अजूनही सूर गवसलेला दिसत नाही. कारण या अनुभवी खेळाडूंकडून अजूनही मोठी खेळी पाहायला मिळालेली नाही. त्याचबरोबर ऋषभ पंत, मनीष पांडे, दिनेश कार्तिक यांनाही अजून छाप पाडता आलेली नाही. गोलंदाजीमध्ये विजय शंकर आणि जयदेव उनाडकट हे सातत्याने भेदक मारा करत आहेत. शार्दुल ठाकूर पहिल्या सामन्यात महागडा ठरला होता. पण दुसऱ्या सामन्यात मात्र त्याने अचूक मारा केला होता. वॉशिंग्टन सुंदर आणि युजवेंद्र चहल हे फिरकीपटू आपली कामगिरी चोख बजावत आहे. भारताने या सामन्यात पुन्हा धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला तर तो त्यांच्या पथ्यावर पडू शकतो.
श्रीलंकेच्या संघाचा विचार केला तर बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर त्यांचे मनोबल खचलेले असेल. त्यामुळे या सामन्यात ते पेटून उठू शकतात. कुशल परेरा हा सध्याच्या घडीला चांगल्या धावा करतो आहे. त्याला कुशल मेंडिसकडून चांगली साथही मिळत आहे. पण गोलंदाजीमध्ये मात्र त्यांना अजून मेहनत घेण्याची गरज आहे. कारण बांगलादेशने गेल्या सामन्यात 214 धावांचे आव्हान पार करत त्यांची गोलंदाजी बोथट असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे भारताविरुद्ध मैदानात उतरताना त्यांना गोलंदाजीला धार आणावी लागेल.
भारत आणि श्रीलंका हे दोन्ही संघ चांगलेच तुल्यबळ आहेत. पण मानसीकतेच्या बाबतीत भारताचे पारडे श्रीलंकेपेक्षा जड असेल. पण दोन्ही संघांना हा सामना जिंकायची समान संधी असणार आहे. अंतिम फेरी गाठण्याच्या हेतूने हा सामना दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा असेल.
अन्य भारतीय खेळाडूंमध्ये मनीष पांडे (३७, २७) फॉर्मात असल्याचे दिसून येते. पुनरागमन करणारा सुरेश रैना व दिनेश कार्तिक मधल्या फळीची जबाबदारी सांभाळत आहेत.
गोलंदाजीमध्ये जयदेव उनाडकटकडून कामगिरीत सातत्य अपेक्षित आहे. त्याने दोन सामन्यात आतापर्यंत ४ बळी घेतले आहेत, पण बºयाच धावा बहाल केल्या आहे. युवा व अनुभव नसलेल्या भारतीय गोलंदाजांनी आतापर्यंत चांगला मारा केला आहे. वॉशिंगटन सुंदर, यजुवेंद्र चहल व विजय शंकर यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे.
विजयी मार्गावर परतण्याचा लंकेचा प्रयत्न
दुसºया बाजूचा विचार करता श्रीलंका संघ शनिवारी बांगलादेशविरुद्ध पत्कराव्या लागलेल्या पराभवातून सावरत आहे. बांगलादेशने मुश्फिकर रहीमच्या (३५ चेंडू, ७२ धावा) अर्धशतकी खेळीच्या जोरावर २१५ धावांचे लक्ष्य पाच गड्यांच्या मोबदल्यात १९.४ षटकांत पूर्ण केले.
बांगलादेशच्या फलंदाजांनी श्रीलंकेविरुद्ध शानदार खेळ केला. लंकेला सोमवारच्या लढतीत गोलंदाजीत सुधारणा करावी लागेल. फलंदाजीत कुसाल मेंडिस व कुसाल परेरा शानदार फॉर्मात आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध भारताला सावध रहावे लागेल. परेराने दोन सामन्यांत ६६ व ७४ धावा, तर मेंडिसने शनिवारी ५७ धावा केल्या.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), लोकेश राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), दीपक हुड्डा, वाश्ािंग्टन सुंदर, यजुवेंंद्र चहल, अक्षर पटेल, विजय शंकर, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज आणि रिषभ पंत (विकेटकीपर).
श्रीलंका : दिनेश चांदीमल (क र्णधार), सूरंगा लकमल (उपकर्णधार), उपुल थरंगा, धनुष्का गुणतिलक, कुसाल मेंडिस, दासुन शनाका, कुसाल जनिथ परेरा, तिसारा परेरा, जीवन मेंडिस, इसुरू उदाना, अकिला धनंजय, अमिला अपोंसो, नुआन प्रदीप, दुष्मंत चामीरा, धनंजय डि सिल्वा.
Web Title: Dudahas Chakk: India ready for the first defeats
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.