मुंबई - ‘एक कसोटी सामना खराब खेळल्याने, कोणताही संघ वाईट ठरत नाही. भारतीय संघ पुनरागमन करु शकतो आणि त्यांना आपल्या कामगिरीचे आत्मपरिक्षण करावे लागेल,’ असे मत आॅस्टेÑलियाचे माजी फलंदाज डीन जोन्स यांनी व्यक्त केले.
सोमवारी मुंबईत आघाडीच्या क्रीडा वाहिनीच्या वतीने १५ सप्टेंबरपासून सुरु होत असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या विशेष मोहिमेचे अनावरण करण्यात आले. यावेळी जोन्स यांनी भारतीय संघाच्या कामगिरीवर मत व्यक्त केले. ते म्हणाले की, ‘केवळ एका सामन्यातील खराब कामगिरीने संपूर्ण संघ वाईट ठरत नाही, अजिबात नाही. इंग्लंडच्या वातावरणामध्ये अशी कामगिरी होऊ शकते. अनेकदा तुम्ही तंत्राविषयी गरजेपेक्षा अधिक विचार करतात आणि निकाल अनपेक्षित लागतात. यामुळे आता भारतीय संघाला आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे.’ त्याचप्रमाणे, ‘भारतीय संघ नक्कीच पुनरागमन करेल अशी मला आशा आहे. त्यांचा एक दिवस खराब राहिला कारण चेंडू खूप स्विंग होत होता,’ असेही जोन्स यांनी म्हटले.
कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांना खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा लागेल. जोन्स म्हणाले की, ‘गमावलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवणे एका प्रशिक्षकासाठी खूप कठीण असते. शास्त्री यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. त्याचबरोबर कर्णधार म्हणून कोहलीलाही
मोठी जबाबदारी पार पाडावी
लागेल.’ (वृत्तसंस्था)
विराट कोहली इंग्लंड दौऱ्यात सध्या पाठीच्या दुखण्याला सामोरे जात आहे. त्यामुळे तो आगामी आशिया चषक स्पर्धेत खेळेल का, असे विचारले असता जोन्स म्हणाले की, ‘विराट लढवय्या खेळाडू आहे. तो असा खेळाडू आहे, त्याला एका पायावर उभे राहून खेळावे लागले, तरी तो खेळेल.’
Web Title: Due to bad play the team is not bad - Dean Jones
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.