- सुनील गावस्कर लिहितात...
हा सर्वोत्तम कसोटी सामना आहे. कुठलाही संघ आम्ही वर्चस्व गाजवित आहो, हे छातीठोकपणे सांगू शकत नाही. हेच उभय संघांतील गोलंदाज व फलंदाजांच्याबाबतीत म्हणता येईल. होय, सामन्यात अशी एक वेळ आली जेव्हा विशेष म्हणजे भारताचा विराट कोहली व दक्षिण आफ्रिकेचा ए. बी. डिव्हिलियर्स फलंदाजी करीत असताना ते वर्चस्व गाजवत असल्याचे चित्र होते, पण खेळपट्टीच्या स्वरूपामुळे कुठल्याही प्रकारचे भाकीत वर्तविणे कठीण आहे. कोहलीच्या शानदार शतकी खेळीमुळे भारताला आव्हान कायम राखता आले. त्यामुळे भारताला दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावातील धावसंख्येच्या जवळपास मजल मारता आली. हे शानदार कसोटी शतक होते. यात तंत्र, संयम, अभेद्य बचाव आणि शानदार फटके या सर्वांचा समावेश होता. शानदार फलंदाजी करणाºया आश्विनने संयम दाखविला असता आणि दुसºया नव्या चेंडूवरील पहिल्याच षटकात आक्रमक फटका खेळण्याची चूक केली नसती तर कदाचित भारताला पहिल्या डावात आघाडी घेता आली असती. आश्विनने पहिल्या दिवशी गोलंदाजी करताना जसे स्वत:ला झोकून दिले अगदी त्याचप्रमाणे त्याने त्यातील काही अंश फलंदाजीमध्ये झोकले तर तो सातत्याने अधिक धावा फटकावू शकतो. उजव्या यष्टिबाहेर चेंडू स्विंग होत असताना आॅन द राईज फटका मारण्याच्या प्रयत्नात तो अनेकदा बाद झाला आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध चार शतके झळकावली आहेत, पण त्या संघात उजव्या यष्टिबाहेर ड्राईव्ह मारण्याच्या मोहात पाडणारे चेंडू टाकणारा एकही गोलंदाज नव्हता, हे विसरता येणार नाही. त्याने जर आपल्या बाद होण्याचे विश्लेषण करण्यास सुरुवात केली तर त्याला कळेल, की त्याला गोलंदाजाने बाद केले नसून त्याने आपली विकेट बहाल केल्याचे निदर्शनास येईल. तिसºया दिवसाच्या सुरुवातीला कोहली व पंड्या यांनी शानदार संयमी सुरुवात केली, पण पंड्याचे धावबाद होणे दक्षिण आफ्रिकेसाठी बोनस विकेट ठरली. क्रिझमध्ये बॅट न ठेवणे किंवा धाव घेण्यासाठी सहकाºयाला जोरदार हाक देणे हे आंतरराष्ट्रीय पातळीवर दिसत नसले तरी भारतीय संघाबाबत असे म्हणता येणार नाही. त्यामुळे दोष द्यायचा झाल्यास युवा खेळाडूंना तयार करणाºया क्रिकेट प्रशिक्षकांना द्यायला हवा. मुंबई क्रिकेटमध्ये शालेय स्तरापासूनच या बाबी क्रिकेटपटूंच्या गळी उतरविण्यात येतात. त्यामुळे मुंबईकर खेळाडू या मूळ बाबी विसरले असे अपवादानेच बघायला मिळते. आपण हा सामना जिंकू शकतो, असा विश्वास भारतीय संघाने बाळगायला हवा. खेळपट्टीवर चेंडू असमतोल उसळत आहे.
आमला बाद झाला त्या वेळी त्याची प्रचिती आली. चेंडू अपेक्षेप्रमाणे उसळलाच नाही. डिव्हिलियर्स बाद झाला तो चेंडू अधिक उसळला. त्यामुळे लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे नाही, पण कर्णधाराप्रमाणे आपणही खेळी करू शकतो, असा विश्वास भारतीय खेळाडूंनी बाळगायला हवा. सध्यापर्यंत शानदार क्रिकेट झाले आहे, पण हे सर्व काही खेळपट्टीमुळे शक्य झाले आहे. खेळपट्टीने फलंदाजांना वर्चस्व गाजवण्याची संधी दिली नाही तर गोलंदाजांनाही दडपण निर्माण करण्याची संधी प्रदान केली नाही. (पीएमजी)
Web Title: Due to the great batting pitch,
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.