मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतही इंडियन प्रीमिअर लीगचा ( आयपीएल) फिव्हर किंचितसाही कमी झालेला नाही. आयपीएलचा 12 वा मोसम निम्म्या टप्प्यात आला आहे आणि प्ले ऑफच्या शर्यतीची चुरस अधिक रंजक होत चाललेली आहे. आयपीएलच्या निमित्ताने पर्यटनालाही बरीच चालना मिळत आहे आणि त्यासंबंधीत उद्योजकांचीही भरभराट होताना पाहायला मिळत आहे. आयपीएलमुळे हॉटेल मालकांनाही अच्छे दिन आले आहेत.
एका सर्व्हेनुसार कॉस्क अँड किंग्स या ट्रॅव्हल कंपनीचा बिझनेस आयपीएलमुळे 30 टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे आयपीएलचा हा फिव्हर कॅच करण्यासाठी अनेक ट्रॅव्हल कंपन्याही वेगवेगळ्या मार्केटिंग फंडे वापरत आहेत. आयपीएलचे सामने पाहण्यासाठी येणाऱ्या क्रिकेटप्रेमींना वेगवेगळ्या ऑफर्सही दिल्या जात आहेत आणि त्याचा थेट फायदा पर्यटनाला होत आहे.
नवी मुंबईच्या सिवूड ग्रँड सेंटर मॉलमध्येही अशीच एक ऑफर आली आहे. 5 एप्रिल ते 19 मे या कालावधीत तेथे 'Ticket to Happyness League’ अशा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेनुसार मॉलमध्ये शॉपिंग केल्यानंतर ग्राहकांच्या खात्यात धावा जमा होणार आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्या ग्राहकाला आयपीएल आणि वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेचे तिकीट दिले जाणार आहे.