लिएंडरचे डेव्हिस कप करिअर संपुष्टात?

एकेरीतील आघाडीचा खेळाडू युकी भांबरी याने साकेत मायनेनीसोबत भारताच्या डेव्हिस चषक टेनिस संघात पुनरागमन केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 01:25 AM2017-08-15T01:25:58+5:302017-08-15T01:26:10+5:30

whatsapp join usJoin us
Due to Leander's Davis Cup Career? | लिएंडरचे डेव्हिस कप करिअर संपुष्टात?

लिएंडरचे डेव्हिस कप करिअर संपुष्टात?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : एकेरीतील आघाडीचा खेळाडू युकी भांबरी याने साकेत मायनेनीसोबत भारताच्या डेव्हिस चषक टेनिस संघात पुनरागमन केले असून, अनुभवी लिएंडर पेस याला अपेक्षेनुसार पुढील महिन्यात कॅनडाविरुद्ध खेळल्या जाणाºया लढतीसाठी संघाबाहेर करण्यात आले.
युकी आणि साकेतशिवाय रामुकमार रामनाथन तसेच रोहन बोपन्ना यांनादेखील महेश भूपतीच्या नेतृत्वाखालील संघात स्थान देण्यात आले आहे. प्रजनेश गुणेश्वरन आणि एन. श्रीराम बालाजी हे दोन राखीव खेळाडू असतील. यामुळे निराश झालेल्या पेसने अपमानास्पद स्थितीत सामन्यादरम्यान आयोजन स्थळाहून काढता पाय घेतला होता. यावर भूपतीने फेसबुकवर टीका करीत, ‘मी पेसला कधीही पहिल्या चारमध्ये स्थान देण्याचे वचन दिले नव्हते’असे लिहिले.
पेसचे सामन्यादरम्यान मैदान सोडणे म्हणजे स्वत:वर संकट ओढवून घेण्यासारखेच असल्याचे भूपतीचे मत होते. त्या वेळी युकी आणि साकेत हे जखमी असल्याने उझबेकिस्तानविरुद्ध संघात नव्हते. आता या दोघांचे संघात आगमन झाले. भारताची कॅनडाविरुद्ध एडमन्टन येथे १५ ते १७ सप्टेंबर या कालावधीत लढत होणार आहे. डेव्हिस चषकात दुहेरीत ४२ विजय नोंदविणाºया पेसला सर्वाधिक विजयाचा विक्रम नोंदविण्यासाठी एका विजयाची गरज आहे; पण तो संघात नाही. (वृत्तसंस्था)
>भारतीत डेव्हिस चषक संघ :
युकी भांबरी, रामकुमार रामनाथन, साकेत मायनेनी, रोहन बोपन्ना. राखीव : प्रजनेश गुणेश्वरन, एन. श्रीराम बालाजी.
पेसला डावलल्याबद्दल विचारताच निवड समितीप्रमुख एस. पी. मिश्रा म्हणाले, ‘पेस नेहमी दावेदार खेळाडूंमध्ये राहीलच. या वेळी रोहन आमची पहिली पसंती होता. आमच्याकडे दुहेरीसाठी एकच जागा शिल्लक होती. आम्ही रोहनला पसंती दर्शविली.
डेव्हिस चषक कोच झिशान अली म्हणाले, विश्व ग्रुपमध्ये दुसºयांदा स्थान मिळविण्यासाठी भारताला संधी आहे. मागच्या तिन्ही प्रयत्नांत सर्बिया, झेक प्रजासत्ताक आणि स्पेनविरुद्ध मायदेशात खेळल्यानंतर हरलो. यंदा विदेशात खेळणार तरीही विजयाची खात्री आहे.
समितीने तुर्कमेनिस्तानमध्ये होणाºया आशियाई इन्डोअर टेनिस स्पर्धेसाठी देखील संघ निवडला आहे. विष्णू वर्धन संघाचे नेतृत्व करणार असून, संघात सुमित नागल, सिद्धार्थ रावत आणि विजय सुंदर प्रशांत हे खेळाडू असून, आशुतोषसिंग हे कोच असतील. महिला संघात अंकिता रैना, प्रार्थना ठोंबरे, धृती टी. वेणुगोपाल व राष्टÑीय चॅम्पियन रिया भाटिया यांचा समावेश आहे. अंकित भांबरी कोच असेल.

Web Title: Due to Leander's Davis Cup Career?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.