ICC Under-19 World Cup Semi Final : पाकिस्तानी क्रिकेट संघाने एका मोठ्या चुकीमुळे १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्या फेरीचा सामना गमावला. सामन्याच्या शेवटच्या षटकात पाकिस्तानला एक विकेट आणि ऑस्ट्रेलियाला विजयासाठी तीन धावांची गरज होती. तेव्हा पहिल्याच चेंडूने बॅटची कड घेतली आणि चेंडू फाइन लेगच्या दिशेने सीमापार गेला. पाकिस्तानने प्रथम खेळताना १७९ धावा केल्या होत्या, तर ऑस्ट्रेलियन संघाने हे लक्ष्य ९ गडी गमावून पूर्ण केले.
पाकिस्तान संघ हा सामना कसा जिंकू शकला असता. वास्तविक या सामन्यात पाकिस्तानने संथ गतीने गोलंदाजी केली. यामुळे त्यांना ५०व्या षटकात ३० यार्डमध्ये एक अतिरिक्त खेळाडू आणावा लागला आमि तो नेमका फाईन लेगचा होता. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज राफ मॅकमिलनच्या बॅटची किनार लागत चेंडू फाईन लेगच्या दिशेने गेला आणि ऑस्ट्रेलियाला चौकार मिळाला.
२०२२मध्ये ICC ने षटकांची गती कायम राखण्यासाठी एक नियम आणला. ज्यामध्ये जर एखाद्या संघाला निर्धारित वेळेत षटक पूर्ण करता येत नसेल तर त्यांना ३० यार्डच्या वर्तुळात अतिरिक्त क्षेत्ररक्षक ठेवावा लागतो. सुरुवातीला हा नियम ट्वेंटी-२०मध्ये लागू करण्यात आला होता. हाच नियम पाकिस्तानला महागात पडला आणि षटकांची गती संथ ठेवल्यामुळे त्यांना शेवटच्या षटकात एक खेळाडू सर्कलच्या आता आणावा लागला.
नाणेफेक गमावल्यानंतर पाकिस्तानचा संघ १७९ धावांवरच मर्यादित राहिला. त्यांनी अवघ्या ७९ धावांत पाच विकेट गमावल्या होत्या. अझान अवैस ( ५२ ) आणि अराफत मिन्हास ( ५२) यांनी अर्धशतके झळकावून पाकिस्तानला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. ऑस्ट्रेलियाकडून टॉम स्ट्रेकरने सर्वाधिक ६ बळी घेतले. १८० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाने ९ फलंदाज १६४ धावांवर गमावले होते. राफ मॅकमिलन व कॅलम व्हिडएर मैदानावर उभे होते. पाकिस्तानला केवळ एक विकेट हवी होती. १६ चेंडूंत ११ धावा हव्या असताना मोहम्मद झीशानच्या बाऊन्सवर ऑसींना चौकार मिळाला. उबैद शाहच्या ४९व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मॅकमिलनसाठी पायचीतची जोरदार अपील झाली, परंतु अम्पायरने नकार दिला. सोबतच अम्पायरने गोलंदाजाला संयम बाळगण्याच्या सूचना केल्या. ६ चेंडूत ३ धावा हव्या असताना चौकार मिळाला आणि ऑस्ट्रेलियाने १ विकेटने ही मॅच जिंकून फायनलमध्ये धडक दिली
Web Title: Due to slow over rate, Pakistan broungt the fine leg fielder in and the ball got inside edge and went to fine leg for four, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.