Join us  

KL राहुलची क्लास फिफ्टी; सहकारी गिलसह विरोधी पंत अन् जैयस्वाल पडले मागे

फलंदाजांची परीक्षा घेणाऱ्या  खेळपट्टीवर  झळकावलेली अर्धशतकी खेळी लोकेश राहुलला टीम इंडियात एन्ट्री देण्यासाठी उपयुक्त ठरेल, अशी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2024 4:49 PM

Open in App

दुलिप करंडक स्पर्धेतील कामगिरीवर अनेक भारतीय स्टार क्रिकेटर्सच्या कमबॅकची गणित अवलंबून आहेत. भारत 'अ', 'ब', 'क' आणि 'ड' या चार वेगवेगळ्या संघाकडून भारतीय स्टार मंडळी मैदानात उतरली होती. लोकेश राहुलचं टीम इंडियातील स्थान तळ्यात मळ्यात आहेस अशीच चर्चा आहे. पण पहिल्या मॅचनंतर जे आकडे आहेत ते मात्र केएल राहुलच्या बाजूनं आहेत. 

शुबमन गिल, पंत आणि जैस्वाल या तिघांपेक्षा भारी ठरला राहुल

भारत 'अ' विरुद्ध भारत 'ब' यांच्यात झालेल्या लढतीत लोकेश राहुलनं एका डावात  कॅप्टन शुबमन गिल, पंत आणि  युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल या मंडळींना मागे टाकले आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारत 'अ' संघाला पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. पण या सामन्यात 'ब' संघाविरुद्ध केलेल्या अर्धशतकी खेळीसह लोकेश राहुल सेफ झोनमध्ये आला आहे.

फलंदाजांना त्रस्त करणाऱ्या खेळपट्टीवर मस्त फिफ्टी

लोकेश राहुलनं पहिल्या डावात ३७ धावांची खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या डावातील ५७ धावांसह त्याने दोन डावात ९४ धावा केल्या. फलंदाजांची परीक्षा घेणाऱ्या  खेळपट्टीवर  झळकावलेली अर्धशतकी खेळी लोकेश राहुलला टीम इंडियात एन्ट्री देण्यासाठी उपयुक्त ठरेल, अशी आहे.

त्यांचा स्ट्राईक रेट उत्तम पण राहुल धावांच्याबाबतीत सर्वोत्तम

भारत 'अ' आणि भारत 'ब' या सामन्याचा विचार केला तर लोकेश राहुलच्या संघाचा कॅप्टन शुबमन गिल याने पहिल्या डावात २१ आणि दुसऱ्या डावात २५ धावांची खेळी केली. दुसरीकडे भारत 'ब' कडून खेळणाऱ्या पंतनं पहिल्या डावात ७ आणि दुसऱ्या डावात ६१ धावा केल्या होत्या. यशस्वी जयस्वालनं पहिल्या डावात ३० आणि दुसऱ्या डावात ९ अशा एकूण ३९ धावा केल्या. त्यांचा स्ट्राईक रेट उत्तम असला तरी सर्वाधिक धावांचा आकडा हा लोकेश राहुलला टीम इंडियात कमबॅकच्या शर्यतीत टिकवून ठेवणारा आहे. शेवटी बीसीसीआय कोणाला संधी देणार? ते टीमची घोषणा झाल्यावरच समजेल.

टॅग्स :लोकेश राहुलभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ