भारत आणि बांगलादेश यांच्यात १९ सप्टेंबरपासून कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेचे वेळापत्रक जाहीर झाले असले तरी अद्याप टीम इंडियाची घोषणा झालेली नाही. पण, याआधी भारतीय संघातील अनेक मोठे स्टार खेळाडू दुलीप ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहेत. यामध्ये सूर्यकुमार यादवच्या नावाचाही समावेश आहे. ही स्पर्धा ५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. दरम्यान, दुखापतीमुळे सूर्यकुमार यादव दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यातून बाहेर झाला असल्याचे कळते.
सूर्यकुमारच्या उजव्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे सूर्यकुमार यादव ५ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफी सामन्यांच्या पहिल्या फेरीत खेळू शकणार नाही. सूर्याने तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन विरुद्ध मुंबईसाठी बुची बाबू निमंत्रण स्पर्धा खेळली. दुखापतीमुळे तो शेवटच्या दिवशी फलंदाजीला येऊ शकला नाही. सूर्यकुमारला आगामी काळात दुलीप ट्रॉफीत खेळायचे आहे. मात्र, याआधी तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत जाणार आहे, अशी माहिती Espncricinfo ने दिली.
दुलीप ट्रॉफीसाठी संघ - अ संघ - शुबमन गिल (कर्णधार), मयंक अग्रवाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, लोकेश राहुल, तिलक वर्मा, शिवम दुबे, तनुष कोटियन, कुलदीप यादव, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, खलील अहमद, आवेश खान, विद्वथ कावेरप्पा, कुमार कुशाग्र, शास्वत रावत. ब संघ - अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, सर्फराज खान, रिषभ पंत, मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, यश दयाल, मुकेश कुमार, राहुल चहर, साई किशोर, मोहित अवस्थी, एन नटराजन.क संघ - ऋतुराज गायकवाड (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल, सूर्यकुमार यादव, बी इंद्रजित, हृथिक शौकीन, मानव सुतार, गौरव यादव, व्यशक विजयकुमार, अंशुल खंबोज, हिमांशू चौहान, मयंक मार्कंडेय, आर्यन जुयाल, संदीप वॉरियर.ड संघ - श्रेयस अय्यर (कर्णधार), अथर्व तायडे, यश दुबे, देवदत्त पडिकल, इशान किशन, रिकी भुई, सारांश जैन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आदित्य ठाकरे, हर्षित राणा, तुषार देशपांडे, आकाश सेंगुप्ता, केएस भरत, सौरभ कुमार.